S M L

'लोकपाल'चे तुकडे करण्याचा सरकारचा डाव - अण्णा

13 नोव्हेंबरजनलोकपाल विधेयकाचे तुकडे तुकडे करुन त्याला कमजोर करण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप आज अण्णा हजारे यांनी सरकारवर केला. येत्या हिवाळी अधिवेशनात सरकारने सशक्त लोकपाल आणलं नाही तर आम्हाला पुन्हा आंदोलन करावं लागेल असा इशाराही अण्णांनी दिला. आज अण्णांनी कोअर कमिटीबाबत झालेल्या निर्णयाचीही माहिती दिली. अण्णा हजारेंनी आपले जवळचे सहकारी अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांच्यासोबत आज एक महत्त्वीच बैठक घेतली. बैठकीनंतर अण्णांनी पुन्हा एकदा सरकारला खणखणीत इशारा दिलाय. हिवाळी अधिवेशनात लोकपाल विधेयक आणलं नाही, तर अण्णा जनलोकपालचा लढा अधिक तीव्र करणार आहेत. म्हणजे अण्णांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टीमेटम दिला. पण सरकारला या डेडलाईनची फारशी काळजी दिसत नाही. तिकडे डावे पक्षसुद्धा हिवाळी अधिवेशनात प्रभावी लोकपाल विधेयक आणावे यासाठी सरकारवर दबाव वाढवत आहे. संसदेची स्थायी समिती सध्या लोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करतेय. 7 डिसेंबरपर्यंत हा मुसदा तयार होण्याची शक्यता आहे. आणि हिवाळी अधिवेशन 21 डिसेंबरला संपतंय. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत विधेयक संसदेत मांडून ते मंजूर करुन घेणं सरकारसाठी जिकरीचं काम असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 13, 2011 09:34 AM IST

'लोकपाल'चे तुकडे करण्याचा सरकारचा डाव - अण्णा

13 नोव्हेंबर

जनलोकपाल विधेयकाचे तुकडे तुकडे करुन त्याला कमजोर करण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप आज अण्णा हजारे यांनी सरकारवर केला. येत्या हिवाळी अधिवेशनात सरकारने सशक्त लोकपाल आणलं नाही तर आम्हाला पुन्हा आंदोलन करावं लागेल असा इशाराही अण्णांनी दिला. आज अण्णांनी कोअर कमिटीबाबत झालेल्या निर्णयाचीही माहिती दिली.

अण्णा हजारेंनी आपले जवळचे सहकारी अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांच्यासोबत आज एक महत्त्वीच बैठक घेतली. बैठकीनंतर अण्णांनी पुन्हा एकदा सरकारला खणखणीत इशारा दिलाय. हिवाळी अधिवेशनात लोकपाल विधेयक आणलं नाही, तर अण्णा जनलोकपालचा लढा अधिक तीव्र करणार आहेत. म्हणजे अण्णांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टीमेटम दिला. पण सरकारला या डेडलाईनची फारशी काळजी दिसत नाही. तिकडे डावे पक्षसुद्धा हिवाळी अधिवेशनात प्रभावी लोकपाल विधेयक आणावे यासाठी सरकारवर दबाव वाढवत आहे.

संसदेची स्थायी समिती सध्या लोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करतेय. 7 डिसेंबरपर्यंत हा मुसदा तयार होण्याची शक्यता आहे. आणि हिवाळी अधिवेशन 21 डिसेंबरला संपतंय. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत विधेयक संसदेत मांडून ते मंजूर करुन घेणं सरकारसाठी जिकरीचं काम असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2011 09:34 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close