S M L

विदर्भात धान उत्पादक हवालदिल !

गोपाल मोटघरे, गोंदिया 13 नोव्हेंबरपश्चिम महाराष्ट्रातल्या उसाच्या दराचा लढा यशस्वी झाला. शेतकर्‍यांच्या आंदोलनानंतर सरकार झुकलं. एकीकडे कापूस उत्पादक शेतकर्‍यांची व्यथा आहे मात्र दुसर्‍या बाजूला विदर्भात धान उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्येकडे बघायला सुध्दा सरकारकडे वेळ नाही. सध्या गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकर्‍यांमध्ये या प्रकारची जनजागृती सुरु आहे. विदर्भात कापूस, सोयाबीन व्यतिरिक्त धानाचे उत्पादनही घेतले जातं. मात्र धान उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्याही कापूस उत्पादक शेतकर्‍यांपेक्षा वेगळ्या नाहीत. राजेंद्र पटले यांनी किसान गर्जना संघटनेच्या माध्यमातून धानाचे आधारभूत भाव वाढून देण्यासाठी जनहित याचिका दाखल केली. याशिवाय जनजागृतीचं कामही त्यांनी हाती घेतलं आहे. पूर्व विदर्भात गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या पाच जिल्ह्यात धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या प्रति क्विंटल धानामागे शेतकर्‍यांना खर्च येतो 3,000 हजाराच्या जवळपास, तर शासनाचा खरेदी भाव आहे तो 1,110 ते 1,080 रुपये प्रति क्विंटल. प्रत्यक्षात मार्केट यार्डमध्ये भाव मिळतो तो 800 ते 900 रुपये प्रति क्विंटल. कापूस, सोयाबीन शेतकर्‍यांच्या आत्महत्येची लाट सध्या विदर्भात सुरु आहे. जर धान उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्या वेळीच सुटल्या नाहीत, तर आत्महत्येची लाट पूर्व विदर्भात पोहचायला वेळ लागणार नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 13, 2011 12:51 PM IST

विदर्भात धान उत्पादक हवालदिल !

गोपाल मोटघरे, गोंदिया

13 नोव्हेंबर

पश्चिम महाराष्ट्रातल्या उसाच्या दराचा लढा यशस्वी झाला. शेतकर्‍यांच्या आंदोलनानंतर सरकार झुकलं. एकीकडे कापूस उत्पादक शेतकर्‍यांची व्यथा आहे मात्र दुसर्‍या बाजूला विदर्भात धान उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्येकडे बघायला सुध्दा सरकारकडे वेळ नाही.

सध्या गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकर्‍यांमध्ये या प्रकारची जनजागृती सुरु आहे. विदर्भात कापूस, सोयाबीन व्यतिरिक्त धानाचे उत्पादनही घेतले जातं. मात्र धान उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्याही कापूस उत्पादक शेतकर्‍यांपेक्षा वेगळ्या नाहीत. राजेंद्र पटले यांनी किसान गर्जना संघटनेच्या माध्यमातून धानाचे आधारभूत भाव वाढून देण्यासाठी जनहित याचिका दाखल केली. याशिवाय जनजागृतीचं कामही त्यांनी हाती घेतलं आहे.

पूर्व विदर्भात गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या पाच जिल्ह्यात धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या प्रति क्विंटल धानामागे शेतकर्‍यांना खर्च येतो 3,000 हजाराच्या जवळपास, तर शासनाचा खरेदी भाव आहे तो 1,110 ते 1,080 रुपये प्रति क्विंटल. प्रत्यक्षात मार्केट यार्डमध्ये भाव मिळतो तो 800 ते 900 रुपये प्रति क्विंटल. कापूस, सोयाबीन शेतकर्‍यांच्या आत्महत्येची लाट सध्या विदर्भात सुरु आहे. जर धान उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्या वेळीच सुटल्या नाहीत, तर आत्महत्येची लाट पूर्व विदर्भात पोहचायला वेळ लागणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2011 12:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close