S M L

माजी क्रिकेटर पीटर रीबोक कालवश

13 नोव्हेंबरमाजी क्रिकेटर आणि समालोचक पीटर रोबक यांचं आज दक्षिण अफ्रिकेत निधन झालं. ते 55 वर्षांचे होते. रोबक यांचा मृतदेह केपटाऊनमधल्या साऊथेन सन हॉटेलमध्ये एका खोलीत आढळून आला. दक्षिण अफ्रिकेत सुरू असलेल्या द.अफ्रिका-ऑस्ट्रेलिया टेस्टमॅचचे वृतांकन करण्यासाठी ते गेले होते. शनिवारी रात्री जेवण केल्यानंतर ते हॉटेलच्या रूममधून बाहेर आलेच नाही. चौकशी केली असता त्यांचा मृतदेह आढळून आला. रीबोक 1980च्या दशकात इंग्लिश कौंटीच्या सोमरसेट टीममध्ये खेळले. त्यादरम्यान त्यांना सर विवियन रिचर्डस आणि इयान बोथम यांच्यासोबत खेळण्याची संधीही मिळाली. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 335 मॅच आहेत. क्रिकेटशिवाय त्यांनी क्रीडा समालोचक आणि स्तंभलेखक म्हणूनही नाव कमावलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 13, 2011 04:18 PM IST

माजी क्रिकेटर पीटर रीबोक कालवश

13 नोव्हेंबर

माजी क्रिकेटर आणि समालोचक पीटर रोबक यांचं आज दक्षिण अफ्रिकेत निधन झालं. ते 55 वर्षांचे होते. रोबक यांचा मृतदेह केपटाऊनमधल्या साऊथेन सन हॉटेलमध्ये एका खोलीत आढळून आला. दक्षिण अफ्रिकेत सुरू असलेल्या द.अफ्रिका-ऑस्ट्रेलिया टेस्टमॅचचे वृतांकन करण्यासाठी ते गेले होते. शनिवारी रात्री जेवण केल्यानंतर ते हॉटेलच्या रूममधून बाहेर आलेच नाही. चौकशी केली असता त्यांचा मृतदेह आढळून आला. रीबोक 1980च्या दशकात इंग्लिश कौंटीच्या सोमरसेट टीममध्ये खेळले. त्यादरम्यान त्यांना सर विवियन रिचर्डस आणि इयान बोथम यांच्यासोबत खेळण्याची संधीही मिळाली. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 335 मॅच आहेत. क्रिकेटशिवाय त्यांनी क्रीडा समालोचक आणि स्तंभलेखक म्हणूनही नाव कमावलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2011 04:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close