S M L

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जी. डी.लाड यांचे निधन

14 नोव्हेंबरज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, क्रांती अग्रणी जी.डी. बापु लाड यांचे आज पहाटे निधन झालं. ते नव्वद वर्षाचे होते. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होता. पत्री सरकारच्या चळवळीद्वारे ब्रिटिश सरकारसमोर त्यांनी मोठं आव्हान निर्माण केलं होतं. नाना पाटील यांच्याबरोबर स्वातंत्र्य संग्रामात जी डी बापु लाड यांनी मोलाची कामगारी बजावली होती.भुमीगत राहुन स्वातंत्र्य लढ्याचं काम करताना ब्रिटिश सत्तेला त्यांनी जेरीस आणलं होतं.स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी त्यांनी ब्रिटिशांचा धुळ्यातला खजिना लुटला होता. स्वातंत्र्य संग्रामात झगडणारा लढवय्या नेता म्हणून जी डी बापु लाड यांची ओळख होती. स्वातंत्र्यानंतर सुद्धा त्यांनी शेतकरी आणि मजुरांसाठी अनेक आंदोलनं केली होती. शेतीसाठी पाणी आणि वीज याकरता त्यांनी लढा उभारला होता. मोर्चे, धरणं यासारखी आंदोलनं करुन त्यांनी सरकारला जनतेच्या प्रश्नांविषयी जाग आणण्याचे काम त्यांनी केलं. कुंडलमध्ये क्रांती सहकारी साकर कारखाना उभा करुन शेतकर्‍याना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2011 12:17 PM IST

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जी. डी.लाड यांचे निधन

14 नोव्हेंबर

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, क्रांती अग्रणी जी.डी. बापु लाड यांचे आज पहाटे निधन झालं. ते नव्वद वर्षाचे होते. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होता. पत्री सरकारच्या चळवळीद्वारे ब्रिटिश सरकारसमोर त्यांनी मोठं आव्हान निर्माण केलं होतं. नाना पाटील यांच्याबरोबर स्वातंत्र्य संग्रामात जी डी बापु लाड यांनी मोलाची कामगारी बजावली होती.भुमीगत राहुन स्वातंत्र्य लढ्याचं काम करताना ब्रिटिश सत्तेला त्यांनी जेरीस आणलं होतं.

स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी त्यांनी ब्रिटिशांचा धुळ्यातला खजिना लुटला होता. स्वातंत्र्य संग्रामात झगडणारा लढवय्या नेता म्हणून जी डी बापु लाड यांची ओळख होती. स्वातंत्र्यानंतर सुद्धा त्यांनी शेतकरी आणि मजुरांसाठी अनेक आंदोलनं केली होती. शेतीसाठी पाणी आणि वीज याकरता त्यांनी लढा उभारला होता. मोर्चे, धरणं यासारखी आंदोलनं करुन त्यांनी सरकारला जनतेच्या प्रश्नांविषयी जाग आणण्याचे काम त्यांनी केलं. कुंडलमध्ये क्रांती सहकारी साकर कारखाना उभा करुन शेतकर्‍याना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2011 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close