S M L

किंगफिशर एअरलाईंसवर 7 हजार कोटींचं कर्ज

14 नोव्हेंबरआर्थिक अडचणीत सापडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सच्या संचालक बोर्डाची आज मुंबईत बैठक झाली. किंगफिशरवर जवळपास सात हजार कोटींचं कर्ज झालं आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी मालमत्ता विकून भांडवल उभारणं आणि युनायटेड ब्रिवरेज या माल्यांच्याच कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे रुपांतर शेअर्समध्ये करणे म्हणजे युनायटेड ब्रिवरेजेसलाच किंगफिशरमध्ये भागधारक करुन घेणं, यासारख्या उपायंवर चर्चा झाली. याशिवाय किंगफिशरला बँकांकडून आणखी कर्ज हवं आहे. याबाबत किंगफिशर व्यवस्थापन उद्या बँकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. पण कर्ज द्यायला बँका फारशा उत्सुक नाही. कर्ज देण्यासाठी किंगफिशरकडे किमान चारशे कोटींची इक्विटी हवी, असं स्टेट बँकेने स्पष्ट केलं. किंगफिशरने पुढच्या आठवड्यातल्या 40 फ्लाईट्स रद्द केल्या आहे. तर गेल्या आठवड्यात जवळपास 200 फ्लाईट्स रद्द केल्या होत्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2011 06:11 PM IST

किंगफिशर एअरलाईंसवर 7 हजार कोटींचं कर्ज

14 नोव्हेंबर

आर्थिक अडचणीत सापडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सच्या संचालक बोर्डाची आज मुंबईत बैठक झाली. किंगफिशरवर जवळपास सात हजार कोटींचं कर्ज झालं आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी मालमत्ता विकून भांडवल उभारणं आणि युनायटेड ब्रिवरेज या माल्यांच्याच कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे रुपांतर शेअर्समध्ये करणे म्हणजे युनायटेड ब्रिवरेजेसलाच किंगफिशरमध्ये भागधारक करुन घेणं, यासारख्या उपायंवर चर्चा झाली. याशिवाय किंगफिशरला बँकांकडून आणखी कर्ज हवं आहे. याबाबत किंगफिशर व्यवस्थापन उद्या बँकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. पण कर्ज द्यायला बँका फारशा उत्सुक नाही. कर्ज देण्यासाठी किंगफिशरकडे किमान चारशे कोटींची इक्विटी हवी, असं स्टेट बँकेने स्पष्ट केलं. किंगफिशरने पुढच्या आठवड्यातल्या 40 फ्लाईट्स रद्द केल्या आहे. तर गेल्या आठवड्यात जवळपास 200 फ्लाईट्स रद्द केल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2011 06:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close