S M L

गिरणी कामगारांचा मुंबई पालिकेला घेराव

15 नोव्हेंबरगिरणी कामगारांच्या घरासाठी गिरणी मालकांनी पुकारलेल्या असहकाराच्या विरोधात आज सर्व गिरणी कामगार संघटनांनी मुंबई महापालिकेला घेराव घातला. गिरणी मालकांनी गिरण्यांची एकतृतीयांश जमीन कामगारांच्या घरासाठी म्हाडाकडे सुपूर्द करणं बंधनकारक आहे. तरी अनेक गिरणी मालकांनी ती अजुनही म्हाडाकडे सुपूर्द केलेली नाही. त्यामुळे या गिरण्यांच्या जागेवर सुरू असलेल्या बांधकामांना महापालिकेनं स्टे ऑर्डर द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनाच्या वेळी अनेक कामगार नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर या आंदोलकांच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी आत सोडलं. पण आयुक्तांनी अपमानास्पद दिल्याचा आरोप या शिष्टमंडळानं केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 15, 2011 09:11 AM IST

गिरणी कामगारांचा मुंबई पालिकेला घेराव

15 नोव्हेंबर

गिरणी कामगारांच्या घरासाठी गिरणी मालकांनी पुकारलेल्या असहकाराच्या विरोधात आज सर्व गिरणी कामगार संघटनांनी मुंबई महापालिकेला घेराव घातला. गिरणी मालकांनी गिरण्यांची एकतृतीयांश जमीन कामगारांच्या घरासाठी म्हाडाकडे सुपूर्द करणं बंधनकारक आहे. तरी अनेक गिरणी मालकांनी ती अजुनही म्हाडाकडे सुपूर्द केलेली नाही. त्यामुळे या गिरण्यांच्या जागेवर सुरू असलेल्या बांधकामांना महापालिकेनं स्टे ऑर्डर द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनाच्या वेळी अनेक कामगार नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर या आंदोलकांच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी आत सोडलं. पण आयुक्तांनी अपमानास्पद दिल्याचा आरोप या शिष्टमंडळानं केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2011 09:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close