S M L

आई वडिलांनी घातल्या मुलांच्या पायात बेड्या

18 नोव्हेंबर नागपूरप्रशांत कोरटकरलहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा...असं आपण म्हणतो पण नागपुरातल्या आदीवासी कॉलनीतल्या दोन मुलांच्या लेखी मात्र काही तरी वेगळंच लिहीलेलं दिसतंय. खुद्द त्यांच्या आई-वडिलांनी स्वत:च्या मुलांच्या पायात गेल्या महिनाभरापासून लोखंडाच्या बेड्या ठोकल्या आहेत. लोखंडी साखऴ्या पायात अडकलेल्या अवस्थेतच ही मुलं वावरत आहेत. ही मुलं खोड्या करतात.जिकडे तिकडे हुंदडतात. हाच त्यांचा दोष.या दोघांच्या खोड्यामुळे कॉलनीतले अनेक जण बेजार झाले होते. सर्वजण त्यांच्याविरोधात त्यांच्या पालकांकडे तक्रारी करीत. त्यामुळे वैतागलेल्या पालकांनी अखेर त्यांना लोखंडाच्या साखऴ्यांमध्ये डांबण्याचा निर्णय घेतला. या मुलांना शाऴेतही घालण्याचा प्रयत्न केला होता, पण मुलं तिथूनही पळून आली. मुलं वाईट संगतीत सापडल्यानं बिघडली असं पालकांचं म्हणणं आहे. त्या मुलांच्या वडिलांनी मात्र मुलांच्या पायात साखळ्या घातल्याचं गैर वाटतं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 18, 2008 02:44 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2008 02:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close