S M L

पुण्यात मेट्रोवरुन पुन्हा एकदा राजकीय वाद

15 नोव्हेंबरसमाविष्ट गावातील टेकड्यांवरील बांधकामाच्या मुद्द्यापाठोपाठ आता मेेट्रो भूमीगत हवी का एलीवेटेड यावरून पुण्यात राजकारण रंगलं आहे. टेकड्यांवर बांधकाम नको तसेच मेट्रो भूमिगत पाहिजे अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी मांडली. या दोन्ही मुद्दयांवरून काँग्रेसने विरोधी भूमिका घेतली. स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेसने भाजपशी हातमिळवणी करत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा भूमिगत मेट्रो प्रस्ताव फेटाळून लावला. स्थायीच्या एकूण 16 सदस्यांपैकी काँग्रेसच्या 5 तर भाजपच्या 2 सदस्यांनी भूमिगत प्रस्तावाच्या विरोधात तर भाजपच्या एकाने प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. राष्ट्रवादीच्या 4 तर सेनेच्या दोघांनी प्रस्तावाच्या बाजूनं मतदान केलं. राष्ट्रवादीचा एक आणि मनसेचा एक नगरसेवक गैरहजर राहिले शेवटी 7-7 असा टाय झाल्यावर स्थायी समितीच्या अध्यक्षांनी कास्टिंग वोट वापरलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 15, 2011 04:32 PM IST

पुण्यात मेट्रोवरुन पुन्हा एकदा राजकीय वाद

15 नोव्हेंबर

समाविष्ट गावातील टेकड्यांवरील बांधकामाच्या मुद्द्यापाठोपाठ आता मेेट्रो भूमीगत हवी का एलीवेटेड यावरून पुण्यात राजकारण रंगलं आहे. टेकड्यांवर बांधकाम नको तसेच मेट्रो भूमिगत पाहिजे अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी मांडली. या दोन्ही मुद्दयांवरून काँग्रेसने विरोधी भूमिका घेतली.

स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेसने भाजपशी हातमिळवणी करत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा भूमिगत मेट्रो प्रस्ताव फेटाळून लावला. स्थायीच्या एकूण 16 सदस्यांपैकी काँग्रेसच्या 5 तर भाजपच्या 2 सदस्यांनी भूमिगत प्रस्तावाच्या विरोधात तर भाजपच्या एकाने प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. राष्ट्रवादीच्या 4 तर सेनेच्या दोघांनी प्रस्तावाच्या बाजूनं मतदान केलं. राष्ट्रवादीचा एक आणि मनसेचा एक नगरसेवक गैरहजर राहिले शेवटी 7-7 असा टाय झाल्यावर स्थायी समितीच्या अध्यक्षांनी कास्टिंग वोट वापरलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2011 04:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close