S M L

पुण्यात कॅन्टॉमेन्टच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांचा धुडगूस

15 नोव्हेंबरपुण्यातील खडकी कॅन्टॉमेन्ट बोर्डाच्या कार्यालयात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात धुडगूस घालत तोडफोड केली.खडकी कॅन्टॉमेन्ट बोर्डाच्या टोल नाक्यावर अवैधरित्या टोल आकारला जातो आणि जड वाहनं दिवसभर शहरात सोडली जातात. यामुळे शहरात अपघातांचे प्रमाण वाढलं त्यामुळे ही वाहतूक बंद करावी असं निवेदन मनसेन दिलं होतं. मनसेचे शिवाजीनगर अध्यक्ष शिवाजी पवार यांनी आज छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंते अरुण गोडबोले यांच्या कार्यालयात जाऊन तक्रारीची दखल का घेतली नाही असा जाब विचारला आणि तोडफोड केली. शिवाजी पवारला खडकी पोलिसांनी अटक केली अरुण गोडबोले यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 15, 2011 04:37 PM IST

पुण्यात कॅन्टॉमेन्टच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांचा धुडगूस

15 नोव्हेंबर

पुण्यातील खडकी कॅन्टॉमेन्ट बोर्डाच्या कार्यालयात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात धुडगूस घालत तोडफोड केली.खडकी कॅन्टॉमेन्ट बोर्डाच्या टोल नाक्यावर अवैधरित्या टोल आकारला जातो आणि जड वाहनं दिवसभर शहरात सोडली जातात. यामुळे शहरात अपघातांचे प्रमाण वाढलं त्यामुळे ही वाहतूक बंद करावी असं निवेदन मनसेन दिलं होतं. मनसेचे शिवाजीनगर अध्यक्ष शिवाजी पवार यांनी आज छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंते अरुण गोडबोले यांच्या कार्यालयात जाऊन तक्रारीची दखल का घेतली नाही असा जाब विचारला आणि तोडफोड केली. शिवाजी पवारला खडकी पोलिसांनी अटक केली अरुण गोडबोले यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2011 04:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close