S M L

टीम इंडियाचा 631 धावांचा डोंगर ; विंडीजची खराब सुरूवात

15 नोव्हेंबरकोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर भारत आणि वेस्टइंडिज दरम्यान दुसरी टेस्ट मॅच रंगत आहे. आणि भारताने 7 विकेट गमावत 631 रन्सवर पहिली इनिंग घोषित केली. याला उत्तर देताना विंडीजची सुरुवात खराब झाली. मॅचच्या दुसर्‍याच ओव्हरमध्ये उमेश यादवनं ओपनर एड्रीयन बराथला आऊट करत विंडीजला पहिला धक्का दिला. तर अश्विननं ब्राथवेटला आऊट करत भारताला आणखी एक यश मिळवून दिलं. त्याआधी व्ही व्ही एस लक्ष्मण डबल सेंच्युरी होण्याआधीच कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने इनिंग घोषीत केली. लक्ष्मण 176 रन्सवर नॉटआऊट राहिला. कॅप्टन धोणीने 144 रन्सची आक्रमक खेळी केली. पण धोणी आऊट झाला आणि थोड्याच वेळात त्याने इनिंगही घोषित केली.कोलकाताचे ईडन गार्डन मैदान भारतासाठी नेहमीच लकी ठरलं आहे. या मैदानावर भारताचा हायेस्ट स्कोर आहे 657 रन्स. आणि याच मैदानावर भारताने 631 रन्सचा डोंगर उभा केला आहे. या इनिंग भारताच्या तब्बल तीन बॅट्समननं सेंच्युरी मारली. टेस्टच्या पहिल्या दिवशी राहुल द्रविडने 119 रन्स केले. टेस्ट करियरमधली ही त्याची 36वी सेंच्युरी होती. तर टेस्टच्या दुसर्‍या दिवशी 'व्हेरी व्हेरी स्पेशल' लक्ष्मणने पावणेदोनेश रन्सचा टप्पा गाठला. याच मैदानावर लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरुध्द 281 रन्सची मॅचविनिंग खेळी केली होती. कॅप्टन महेंद्रसिंग धोणीनंही 144 रन्सची आक्रमक बॅटिंग केली. आपल्या खेळीत त्याने 10 फोर आणि 5 सिक्सीच बरसात केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 15, 2011 10:45 AM IST

टीम इंडियाचा 631 धावांचा डोंगर ; विंडीजची खराब सुरूवात

15 नोव्हेंबर

कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर भारत आणि वेस्टइंडिज दरम्यान दुसरी टेस्ट मॅच रंगत आहे. आणि भारताने 7 विकेट गमावत 631 रन्सवर पहिली इनिंग घोषित केली. याला उत्तर देताना विंडीजची सुरुवात खराब झाली. मॅचच्या दुसर्‍याच ओव्हरमध्ये उमेश यादवनं ओपनर एड्रीयन बराथला आऊट करत विंडीजला पहिला धक्का दिला. तर अश्विननं ब्राथवेटला आऊट करत भारताला आणखी एक यश मिळवून दिलं. त्याआधी व्ही व्ही एस लक्ष्मण डबल सेंच्युरी होण्याआधीच कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने इनिंग घोषीत केली. लक्ष्मण 176 रन्सवर नॉटआऊट राहिला. कॅप्टन धोणीने 144 रन्सची आक्रमक खेळी केली. पण धोणी आऊट झाला आणि थोड्याच वेळात त्याने इनिंगही घोषित केली.

कोलकाताचे ईडन गार्डन मैदान भारतासाठी नेहमीच लकी ठरलं आहे. या मैदानावर भारताचा हायेस्ट स्कोर आहे 657 रन्स. आणि याच मैदानावर भारताने 631 रन्सचा डोंगर उभा केला आहे. या इनिंग भारताच्या तब्बल तीन बॅट्समननं सेंच्युरी मारली. टेस्टच्या पहिल्या दिवशी राहुल द्रविडने 119 रन्स केले. टेस्ट करियरमधली ही त्याची 36वी सेंच्युरी होती. तर टेस्टच्या दुसर्‍या दिवशी 'व्हेरी व्हेरी स्पेशल' लक्ष्मणने पावणेदोनेश रन्सचा टप्पा गाठला. याच मैदानावर लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरुध्द 281 रन्सची मॅचविनिंग खेळी केली होती. कॅप्टन महेंद्रसिंग धोणीनंही 144 रन्सची आक्रमक बॅटिंग केली. आपल्या खेळीत त्याने 10 फोर आणि 5 सिक्सीच बरसात केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2011 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close