S M L

टू जी घोटाळ्यात सरकारचे नुकसान किती ?

15 नोव्हेंबर2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सरकारचं नेमकं किती नुकसान झालं यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. कॅगचे विनोद राय यांनी घोटाळ्याचा आकडा फुगवून सांगितला, हा आर पी सिंग यांचा आरोप राय यांनी आज खोडून काढला. सिंग हे स्पेक्ट्रम वाटपाच्या प्रक्रियेचे लीड ऑडिटर होते. दरम्यान, आयबीएन नेटवर्कच्या हाती लागलेल्या एका पत्रानुसार कॅग यांच्या कार्यालयातील अधिकारी आर बी सिन्हा हे स्पेक्ट्रम घोटाळ्याचा अहवाल जाहीर होण्याच्या आधीपासून मुरली मनोहर जोशींच्या संपर्कात होते. त्यामुळे लोक लेखा समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी घोटाळ्याचा आकडा फुगवण्यासाठी दबाव आणला, असा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला. पण कॅग विनोद राय यांनी याही आरोपाचं खंडन केलंय. स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करणा-या संयुक्त संसदीय समितीसमोर आज राय यांनी साक्ष दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 15, 2011 05:11 PM IST

टू जी घोटाळ्यात सरकारचे नुकसान किती ?

15 नोव्हेंबर

2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सरकारचं नेमकं किती नुकसान झालं यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. कॅगचे विनोद राय यांनी घोटाळ्याचा आकडा फुगवून सांगितला, हा आर पी सिंग यांचा आरोप राय यांनी आज खोडून काढला. सिंग हे स्पेक्ट्रम वाटपाच्या प्रक्रियेचे लीड ऑडिटर होते. दरम्यान, आयबीएन नेटवर्कच्या हाती लागलेल्या एका पत्रानुसार कॅग यांच्या कार्यालयातील अधिकारी आर बी सिन्हा हे स्पेक्ट्रम घोटाळ्याचा अहवाल जाहीर होण्याच्या आधीपासून मुरली मनोहर जोशींच्या संपर्कात होते. त्यामुळे लोक लेखा समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी घोटाळ्याचा आकडा फुगवण्यासाठी दबाव आणला, असा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला. पण कॅग विनोद राय यांनी याही आरोपाचं खंडन केलंय. स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करणा-या संयुक्त संसदीय समितीसमोर आज राय यांनी साक्ष दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2011 05:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close