S M L

सत्तेच्या लालसेपोटी कुलकर्णी यांची हत्या ?

अमेय तिरोडकर, मुंबई15 नोव्हेंबरभक्कम राजकीय पाठबळ असल्यामुळेच गणेश कुलकर्णी यांची हत्या करण्याची हिम्मत आरोपी संदीप पाटील दाखवू शकला. थेट तालुक्याच्या आमदाराशीच नातं असल्यामुळे आपल्या कुठल्याही कृत्यावर पांघरूण घातलं जाईल अशी त्याला खात्री असावी. त्यामुळेच उपळाई मधल्या आपल्या 40 वर्षांच्या सत्तेला निर्माण झालेलं आव्हान संपवायचा कट आरोपींनी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी केला असं म्हटलं जातं आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी उपसरपंच झालेल्या गणेश कुलकर्णी यांचा खून आणि त्यात पकडले गेलेले आरोपी त्याच गावचे माजी सरपंच संदीप पाटील. खून झाला त्याआधी बरोब्बर एक वर्षं म्हणजे 14 ऑक्टोबर 2010 रोजी गणेश कुलकर्णी या गावचे उपसरपंच झाले आणि या गावावर असलेली पाटील घराण्याची तब्बल 40 वर्षांची सत्ता उलथून पडली. गेली चार दशकं उपळाईचं सरपंच पद संदीप पाटील याच्याच घरात राहीलं. विष्णुपंत पाटील : 80 च्या दशकात उपळाईचे सरपंच होते. आरोपी संदीप पाटील ह्याचे ते वडील. * लखुजी पाटील : 1995 ते 2000 ह्या काळात हे सरपंच राहीलेत. ते संदीप पाटील याचे सख्खे काका तर, आणखी एक आरोपी दीपक पाटील याचे वडील. * दीपक पाटील : 2000 ते 2010 या काळात दीपक सरपंच होता, गणेश कुलकर्णी खून प्रकरणात सध्या तो अटकेत आहे. * संदीप पाटील : 2005 ते 2010आमदार बबन शिंदे यांच्या पत्नी या संदीप पाटील आणि दीपक पाटील या आरोपींची सख्खी आत्या. हे झालं आमदारांचं ह्या घराशी असलेलं नातं. पण, इतकंच नाही. ह्या आरोपींपैकी काही जण हे बबन शिंदे ह्यांच्याशी संबंधित संस्थांमध्ये नोकरीला आहेत. * दीपक पाटील : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रोपळेगांव ह्या शाखेत हा सचिव म्हणून काम करतो. जिल्हा बँकेचे सध्या अध्यक्ष आहेत संजय शिंदे. हे संजय शिंदे बबन शिंदे यांचे सावत्र भाऊ आहेत. * अण्णासाहेब शिंदे : सोलापूर जिल्हा बँकेच्या उपळाई शाखेत हा कॅशिअर म्हणून काम करतो. *संतोष कदम : बबन शिंदे यांच्या विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत हा शिपाई म्हणून काम करतो. * रामलिंग हराळे : हा सोलापूर दूध संघात कामाला आहे. बबन शिंदे संघाचे अध्यक्ष असतानाच्या काळात ह्याला नोकरी लागली आहे. हे आरोपी इतक्या जवळचे असले तरीही आमदार बबन शिंदे मात्र आपल्या त्यांच्याशी गणेश कुलकर्णी खून प्रकरणात काही संबंध नाही असा दावा करत आहेत. पण, उपळाई खुर्द इथली जनता मात्र बबन शिंदे यांनाच या प्रकरणासाठी जबाबदार धरत आहे. एकीकडे गावाची जनता अशी आपल्याच आमदारावर विश्वास ठेवायला तयार नाही. अशावेळी इथले खासदार असेलेले कृषिमंत्री शरद पवार ह्या प्रकरणात लक्ष घालणार का ? नक्की खून का झाला आणि कोणी करायला लावला याची शहानिशा करणार का ? असे प्रश्न या गावच्या ग्रामस्थांच्या मनात आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 15, 2011 05:31 PM IST

सत्तेच्या लालसेपोटी कुलकर्णी यांची हत्या ?

अमेय तिरोडकर, मुंबई

15 नोव्हेंबर

भक्कम राजकीय पाठबळ असल्यामुळेच गणेश कुलकर्णी यांची हत्या करण्याची हिम्मत आरोपी संदीप पाटील दाखवू शकला. थेट तालुक्याच्या आमदाराशीच नातं असल्यामुळे आपल्या कुठल्याही कृत्यावर पांघरूण घातलं जाईल अशी त्याला खात्री असावी. त्यामुळेच उपळाई मधल्या आपल्या 40 वर्षांच्या सत्तेला निर्माण झालेलं आव्हान संपवायचा कट आरोपींनी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी केला असं म्हटलं जातं आहे.

अवघ्या वर्षभरापूर्वी उपसरपंच झालेल्या गणेश कुलकर्णी यांचा खून आणि त्यात पकडले गेलेले आरोपी त्याच गावचे माजी सरपंच संदीप पाटील. खून झाला त्याआधी बरोब्बर एक वर्षं म्हणजे 14 ऑक्टोबर 2010 रोजी गणेश कुलकर्णी या गावचे उपसरपंच झाले आणि या गावावर असलेली पाटील घराण्याची तब्बल 40 वर्षांची सत्ता उलथून पडली. गेली चार दशकं उपळाईचं सरपंच पद संदीप पाटील याच्याच घरात राहीलं.

विष्णुपंत पाटील : 80 च्या दशकात उपळाईचे सरपंच होते. आरोपी संदीप पाटील ह्याचे ते वडील. * लखुजी पाटील : 1995 ते 2000 ह्या काळात हे सरपंच राहीलेत. ते संदीप पाटील याचे सख्खे काका तर, आणखी एक आरोपी दीपक पाटील याचे वडील. * दीपक पाटील : 2000 ते 2010 या काळात दीपक सरपंच होता, गणेश कुलकर्णी खून प्रकरणात सध्या तो अटकेत आहे. * संदीप पाटील : 2005 ते 2010

आमदार बबन शिंदे यांच्या पत्नी या संदीप पाटील आणि दीपक पाटील या आरोपींची सख्खी आत्या. हे झालं आमदारांचं ह्या घराशी असलेलं नातं. पण, इतकंच नाही. ह्या आरोपींपैकी काही जण हे बबन शिंदे ह्यांच्याशी संबंधित संस्थांमध्ये नोकरीला आहेत.

* दीपक पाटील : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रोपळेगांव ह्या शाखेत हा सचिव म्हणून काम करतो. जिल्हा बँकेचे सध्या अध्यक्ष आहेत संजय शिंदे. हे संजय शिंदे बबन शिंदे यांचे सावत्र भाऊ आहेत. * अण्णासाहेब शिंदे : सोलापूर जिल्हा बँकेच्या उपळाई शाखेत हा कॅशिअर म्हणून काम करतो. *संतोष कदम : बबन शिंदे यांच्या विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत हा शिपाई म्हणून काम करतो. * रामलिंग हराळे : हा सोलापूर दूध संघात कामाला आहे. बबन शिंदे संघाचे अध्यक्ष असतानाच्या काळात ह्याला नोकरी लागली आहे.

हे आरोपी इतक्या जवळचे असले तरीही आमदार बबन शिंदे मात्र आपल्या त्यांच्याशी गणेश कुलकर्णी खून प्रकरणात काही संबंध नाही असा दावा करत आहेत. पण, उपळाई खुर्द इथली जनता मात्र बबन शिंदे यांनाच या प्रकरणासाठी जबाबदार धरत आहे.

एकीकडे गावाची जनता अशी आपल्याच आमदारावर विश्वास ठेवायला तयार नाही. अशावेळी इथले खासदार असेलेले कृषिमंत्री शरद पवार ह्या प्रकरणात लक्ष घालणार का ? नक्की खून का झाला आणि कोणी करायला लावला याची शहानिशा करणार का ? असे प्रश्न या गावच्या ग्रामस्थांच्या मनात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2011 05:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close