S M L

कापूस आंदोलनाला हिंसक वळण

16 नोव्हेंबरकापसाला 6 हजार हमी भाव देण्यात यावा या मागणीसाठी गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. अमरावतीत शिवसैनिकांनी कापूस फेडरेशनचं ऑफिस पेटवून दिलं. कार्यालयातील फर्निचरची कार्यकर्त्यांनी तोडफोड केली कार्यकर्त्यांचा संताप येथेच थांबला नाही आणि त्यांनी पूर्ण कार्यालय पेटवून दिले. तसेच काही एस टी बसेस आणि सिव्हील सर्जनची गाडीही आंदोलनकर्त्यांनी फोडली. तर दुसरीकडे कापसाला 6 हजार प्रति क्विंटल हमीभाव मिळावा म्हणून बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी अमरावती तुरूंगात सुरु केलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस उजाडला आहे. राणांसोबत आज 1200 इतर कैदीही उपोषणाला बसणार आहे. कापसाला 6 हजार प्रति क्विंटल हमीभाव मिळावा म्हणून रवी राणा यांनी अमरावतीत चक्काजाम आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर त्यांच्यासह 38 कार्यकर्त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. ऊसाला भाव वाढवून मिळाला पण विदर्भातला कापूस शेतकरी अजूनही दुर्लक्षितचं आहे. त्यामुळे राणांनी कारागृहातच उपोषण सुरु केलं. राणा यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍यांचंही उपोषण सुरु झालं आहे. जोपर्यंत कापसाला 6000 रुपये हमी भाव मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार राणा यांनी केला.शिवसेनेची कापूस दिंडीची घोषणादरम्यान, कापूस प्रश्नी शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. 20 तारखेपर्यंत सरकारने कापसाचा प्रश्न सोडवला नाही तर 21 ते 29 नोव्हेंबर दरम्यान शिवसेनेची विदर्भात पुन्हा कापूस दिंडी काढणार असा इशारा दिली. या दींडीत उध्दव ठाकरेही सहभागी होणार आहेत. तसेच शिवसेनेनं अमरावतीत राष्ट्रीय महामार्ग 6 वर चक्काजाम आंदोलन केलं. शिवसैनिकांनी अमरावतीत केलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. यात एक बस आणि दोन जीपची तोडफोडही क रण्यात आली. तर बडनेरात सिव्हिल सर्जनची गाडी फोडली. तर नांदेडमध्ये शिवसैनिकांनी नांदेड - परभणी रस्त्यावर रास्तारोको केला. शिवसैनिकांनी 2 तास हा रस्ता रोखून धरला होता. शिवसेनेनं केलेल्या आंदोलनात 200 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बुलठाणा जिल्ह्यात चिखली रोडवर शिवसेनेनं रास्तारोको केला. कापूस, सोयाबीनला हमीभाव वाढून देण्याची मागणी करत साकळी फाट्याजवळ रास्तारोको केला. आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं हे आंदोलन सुरू केलं. आंदोलनकर्त्यांनी 1 तास रस्ता रोखून धरला. दरम्यान, विजयराज शिंदे यांच्यासह 30 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसेच जिल्ह्यातल्या जळगाव जामोद इथंही शिवसेनेनं रास्तारोको केला. शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव-जामोदला रास्तारोको सुरु आहे.यवतमाळमधल्या वणीमध्ये मनसेनं आंदोलन केलं. या 200 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कापसाला 6000 रूपये प्रति क्विंटल हमीभाव मिळावा या मागणीसाठी विदर्भातील शेतकरी रस्त्यावर उतरलेत. शेतकर्‍यांसोबतच मनसेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात उडी घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2011 05:45 PM IST

कापूस आंदोलनाला हिंसक वळण

16 नोव्हेंबर

कापसाला 6 हजार हमी भाव देण्यात यावा या मागणीसाठी गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. अमरावतीत शिवसैनिकांनी कापूस फेडरेशनचं ऑफिस पेटवून दिलं. कार्यालयातील फर्निचरची कार्यकर्त्यांनी तोडफोड केली कार्यकर्त्यांचा संताप येथेच थांबला नाही आणि त्यांनी पूर्ण कार्यालय पेटवून दिले. तसेच काही एस टी बसेस आणि सिव्हील सर्जनची गाडीही आंदोलनकर्त्यांनी फोडली.

तर दुसरीकडे कापसाला 6 हजार प्रति क्विंटल हमीभाव मिळावा म्हणून बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी अमरावती तुरूंगात सुरु केलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस उजाडला आहे. राणांसोबत आज 1200 इतर कैदीही उपोषणाला बसणार आहे. कापसाला 6 हजार प्रति क्विंटल हमीभाव मिळावा म्हणून रवी राणा यांनी अमरावतीत चक्काजाम आंदोलन केलं होतं.

या आंदोलनानंतर त्यांच्यासह 38 कार्यकर्त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. ऊसाला भाव वाढवून मिळाला पण विदर्भातला कापूस शेतकरी अजूनही दुर्लक्षितचं आहे. त्यामुळे राणांनी कारागृहातच उपोषण सुरु केलं. राणा यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍यांचंही उपोषण सुरु झालं आहे. जोपर्यंत कापसाला 6000 रुपये हमी भाव मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार राणा यांनी केला.

शिवसेनेची कापूस दिंडीची घोषणा

दरम्यान, कापूस प्रश्नी शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. 20 तारखेपर्यंत सरकारने कापसाचा प्रश्न सोडवला नाही तर 21 ते 29 नोव्हेंबर दरम्यान शिवसेनेची विदर्भात पुन्हा कापूस दिंडी काढणार असा इशारा दिली. या दींडीत उध्दव ठाकरेही सहभागी होणार आहेत. तसेच शिवसेनेनं अमरावतीत राष्ट्रीय महामार्ग 6 वर चक्काजाम आंदोलन केलं.

शिवसैनिकांनी अमरावतीत केलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. यात एक बस आणि दोन जीपची तोडफोडही क रण्यात आली. तर बडनेरात सिव्हिल सर्जनची गाडी फोडली. तर नांदेडमध्ये शिवसैनिकांनी नांदेड - परभणी रस्त्यावर रास्तारोको केला. शिवसैनिकांनी 2 तास हा रस्ता रोखून धरला होता. शिवसेनेनं केलेल्या आंदोलनात 200 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बुलठाणा जिल्ह्यात चिखली रोडवर शिवसेनेनं रास्तारोको केला. कापूस, सोयाबीनला हमीभाव वाढून देण्याची मागणी करत साकळी फाट्याजवळ रास्तारोको केला. आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं हे आंदोलन सुरू केलं. आंदोलनकर्त्यांनी 1 तास रस्ता रोखून धरला. दरम्यान, विजयराज शिंदे यांच्यासह 30 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसेच जिल्ह्यातल्या जळगाव जामोद इथंही शिवसेनेनं रास्तारोको केला. शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव-जामोदला रास्तारोको सुरु आहे.

यवतमाळमधल्या वणीमध्ये मनसेनं आंदोलन केलं. या 200 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कापसाला 6000 रूपये प्रति क्विंटल हमीभाव मिळावा या मागणीसाठी विदर्भातील शेतकरी रस्त्यावर उतरलेत. शेतकर्‍यांसोबतच मनसेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात उडी घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2011 05:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close