S M L

मालेगाव स्फोटातील 7 आरोपींची जामिनावर सुटका

16 नोव्हेंबरमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सात आरोपींची आज सुटका झाली. मालेगावमध्ये 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात नऊ मुस्लिम तरुणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी सातजणांची आज तुरुंगातून सुटका झाली. हे सर्व आरोपी मालेगावचे आहेत. एनआयए (NIA) च्या चौकशीत बॉम्बस्फोटात या तरुणांचा सहभाग नसल्याचं स्पष्ट झालं होतं. आणि त्यांना जामीन मिळाला होता. मालेगावमधे 8 सप्टेंबर 2006 ला बडी रातच्या दिवशी हा बॉम्बस्फोट झाला होता. यावेळी 25 जण ठार तर 102 जण जखमी झाले होते. याप्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र एटीएसने केला होता. त्यानंतर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. यानंतर यावर्षी मार्च महिन्यात हे प्रकरण नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे सोपवण्यात आलं आहे. एनआयए (NIA) तपास करत असलेल्या दुसर्‍या एका प्रकरणात स्वामी असीमानंद यांना अटक केल्यानंतर त्यांच्या जबाबात मालेगाव येथे 2006 साली झालेल्या बॉम्ब स्फोटदेखील हिंदुत्ववादी संघटनांनीच केल्याचं उघड झालं होतं.दरम्यान, मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपींना जामीन मिळाल्यानंतर मालेगाव मध्ये मिठाई वाटून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. या आरोपींपैकी एक आरोपी जाहीद मजीद याच्या कुटुंबींयंानी गेल्या पाच वर्षातल्या नुकसानीची भरपाई मागितली आहे. मुख्य संशयित आरोपी शब्बीर बॅटरीवाला याच्या घरची मंडळींही शब्बीरच्या येण्याची वाट बघत आहे. दरम्यान या आरोपींच्या जामिनाच्या नंतर मालेगावमध्ये राजकारण सुरु झालंय. ते याच्या श्रेयावरुन काँग्रेसचे गृह राज्यमंत्री आणि अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष नसीम खान मालेगावमध्ये दाखल झाले आहेत. दुसरीकडे या आरोपींच्या सुटकेसाठी जनता दल सेक्युलरच्यावतीने गेल्या दोनशे दिवसांपासून मुशवरा चौकात धरणे आंदोलन करण्यात आलं होतं. त्यांनी या आरोपींना जामीन मिळण्यास झालेल्या उशीरा बद्दल काँग्रेसलाच दोषी ठरवलं आहे. 8 सप्टेंबर 2006...शुक्रवार...दुपारी 1 वाजून 15 मिनिटे...शब्बे बारातच्या दिवशी प्रार्थनेच्या वेळी मालेगावमध्ये एका मशिदीजवळ स्फोट झाला. त्यात 31 जणांचा मृत्यू झाला तर 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. याप्रकरणी काही महिन्यांत मालेगावमधल्या 9 मुस्लीम तरुणांना अटक झाली. आणि एटीएसनं त्यांच्याविरोधात चार्जशीटसुद्धा दाखल केलं. नंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. पण गेल्या वर्षी मक्का मस्जिद बॉम्बस्फोटप्रकरणी स्वामी असिमानंदला एनआयए (NIA) नं अटक केली. आणि या मालेगाव बॉम्बस्फोटाला वेगळं वळण मिळालं. डिसेंबर 2010 मध्ये असिमानंदनं कबुलीजबाब दिला. त्यात त्यानं म्हटलं. "जून 2006 मध्ये मी, रितेश्वर, साध्वी प्रज्ञासिंग आणि सुनील जोशी यांची वलसाडमध्ये बैठक झाली. त्याचवेळी मी असं सुचवलं की, मालेगांवमध्ये 80 टक्के मुस्लीम आहेत. आणि म्हणून मालेगावमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा सल्ला मी दिला."असिमानंदच्या कबुलीजबाबानंतर एनआयएनं या प्रकरणाचा तपास हाती घेतला.5 नोव्हेंबर 2011 रोजी एनआयएनं कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यात म्हटलं आहे. 'स्वामी असिमानंदच्या कबुलीजबाबानंतर बॉम्बस्फोटाच्या तपासात मिळालेले पुरावे पुन्हा तपासण्यात आले. आणि नवे पुरावेही जमवण्यात आले. त्यातून नवे तथ्य समोर आलेत.' त्यानंतर मोक्का कोर्टाने या 9 आरोपींना जामीन मंजूर केला. त्यानुसार तब्बल पाच वर्षांनी त्यातले 7 आरोपी तुरुंगाबाहेर आले. त्यातले दोन आरोपी आणखी एका बॉम्बस्फोटात संशयित असल्याने त्यांची सुटका होऊ शकली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2011 04:06 PM IST

मालेगाव स्फोटातील 7 आरोपींची जामिनावर सुटका

16 नोव्हेंबर

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सात आरोपींची आज सुटका झाली. मालेगावमध्ये 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात नऊ मुस्लिम तरुणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी सातजणांची आज तुरुंगातून सुटका झाली. हे सर्व आरोपी मालेगावचे आहेत. एनआयए (NIA) च्या चौकशीत बॉम्बस्फोटात या तरुणांचा सहभाग नसल्याचं स्पष्ट झालं होतं. आणि त्यांना जामीन मिळाला होता.

मालेगावमधे 8 सप्टेंबर 2006 ला बडी रातच्या दिवशी हा बॉम्बस्फोट झाला होता. यावेळी 25 जण ठार तर 102 जण जखमी झाले होते. याप्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र एटीएसने केला होता. त्यानंतर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. यानंतर यावर्षी मार्च महिन्यात हे प्रकरण नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे सोपवण्यात आलं आहे.

एनआयए (NIA) तपास करत असलेल्या दुसर्‍या एका प्रकरणात स्वामी असीमानंद यांना अटक केल्यानंतर त्यांच्या जबाबात मालेगाव येथे 2006 साली झालेल्या बॉम्ब स्फोटदेखील हिंदुत्ववादी संघटनांनीच केल्याचं उघड झालं होतं.

दरम्यान, मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपींना जामीन मिळाल्यानंतर मालेगाव मध्ये मिठाई वाटून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. या आरोपींपैकी एक आरोपी जाहीद मजीद याच्या कुटुंबींयंानी गेल्या पाच वर्षातल्या नुकसानीची भरपाई मागितली आहे. मुख्य संशयित आरोपी शब्बीर बॅटरीवाला याच्या घरची मंडळींही शब्बीरच्या येण्याची वाट बघत आहे.

दरम्यान या आरोपींच्या जामिनाच्या नंतर मालेगावमध्ये राजकारण सुरु झालंय. ते याच्या श्रेयावरुन काँग्रेसचे गृह राज्यमंत्री आणि अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष नसीम खान मालेगावमध्ये दाखल झाले आहेत. दुसरीकडे या आरोपींच्या सुटकेसाठी जनता दल सेक्युलरच्यावतीने गेल्या दोनशे दिवसांपासून मुशवरा चौकात धरणे आंदोलन करण्यात आलं होतं. त्यांनी या आरोपींना जामीन मिळण्यास झालेल्या उशीरा बद्दल काँग्रेसलाच दोषी ठरवलं आहे.

8 सप्टेंबर 2006...शुक्रवार...दुपारी 1 वाजून 15 मिनिटे...शब्बे बारातच्या दिवशी प्रार्थनेच्या वेळी मालेगावमध्ये एका मशिदीजवळ स्फोट झाला. त्यात 31 जणांचा मृत्यू झाला तर 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. याप्रकरणी काही महिन्यांत मालेगावमधल्या 9 मुस्लीम तरुणांना अटक झाली. आणि एटीएसनं त्यांच्याविरोधात चार्जशीटसुद्धा दाखल केलं. नंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला.

पण गेल्या वर्षी मक्का मस्जिद बॉम्बस्फोटप्रकरणी स्वामी असिमानंदला एनआयए (NIA) नं अटक केली. आणि या मालेगाव बॉम्बस्फोटाला वेगळं वळण मिळालं. डिसेंबर 2010 मध्ये असिमानंदनं कबुलीजबाब दिला. त्यात त्यानं म्हटलं. "जून 2006 मध्ये मी, रितेश्वर, साध्वी प्रज्ञासिंग आणि सुनील जोशी यांची वलसाडमध्ये बैठक झाली. त्याचवेळी मी असं सुचवलं की, मालेगांवमध्ये 80 टक्के मुस्लीम आहेत. आणि म्हणून मालेगावमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा सल्ला मी दिला."

असिमानंदच्या कबुलीजबाबानंतर एनआयएनं या प्रकरणाचा तपास हाती घेतला.5 नोव्हेंबर 2011 रोजी एनआयएनं कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यात म्हटलं आहे. 'स्वामी असिमानंदच्या कबुलीजबाबानंतर बॉम्बस्फोटाच्या तपासात मिळालेले पुरावे पुन्हा तपासण्यात आले. आणि नवे पुरावेही जमवण्यात आले. त्यातून नवे तथ्य समोर आलेत.' त्यानंतर मोक्का कोर्टाने या 9 आरोपींना जामीन मंजूर केला. त्यानुसार तब्बल पाच वर्षांनी त्यातले 7 आरोपी तुरुंगाबाहेर आले. त्यातले दोन आरोपी आणखी एका बॉम्बस्फोटात संशयित असल्याने त्यांची सुटका होऊ शकली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2011 04:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close