S M L

हॉटेल मालकाने नाट्य परीक्षकांना बाहेर काढले

16 नोव्हेंबरराज्य नाट्य स्पर्धेच्या पुणे शहरात होत असलेल्या स्पर्धेच्या परीक्षकांना हॉटेल मालकाने भाडं भरलं नाही म्हणून बाहेर काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला. पुण्यातील भरत नाट्य संस्थेत ही स्पर्धा सुरू आहे. भरत नाट्य संस्थेजवळील श्रीनाथ लॉजमधे या स्पर्धेसाठी बाहेरगावहून आलेले परीक्षक उतरले होते. पण गेल्या वर्षीचं भाडं थकीत असल्याने हॉटेल मालकाने सोलापूरचे शिवानंद चलवादी, मुंबईच्या सुलभा मंत्री आमि अर्चना नाईक यांचं सामान लॉज मधून बाहेर काढलं. त्यानंतर हे परीक्षक टिळक स्मारक मंदीरात आले. नाट्य परिषदेचे पुणे शाखेचे प्रमुख सतिश देसाईंनी त्यांची गाठ घेतली. देसाईंनी ताबडतोब राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांच्याशी फोनवरून संपर्कही साधला. पण या सावळ्या गोंधळाला नेमकं सांस्कृतिक खातं जबाबदार का समाजकल्याण विभाग हा वाद आता रंगला आहे. एकूणच सरकारी गलथानपणाचा नाहक फटका या परीक्षकांना सहन करावा लागतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2011 11:52 AM IST

हॉटेल मालकाने नाट्य परीक्षकांना बाहेर काढले

16 नोव्हेंबर

राज्य नाट्य स्पर्धेच्या पुणे शहरात होत असलेल्या स्पर्धेच्या परीक्षकांना हॉटेल मालकाने भाडं भरलं नाही म्हणून बाहेर काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला. पुण्यातील भरत नाट्य संस्थेत ही स्पर्धा सुरू आहे. भरत नाट्य संस्थेजवळील श्रीनाथ लॉजमधे या स्पर्धेसाठी बाहेरगावहून आलेले परीक्षक उतरले होते. पण गेल्या वर्षीचं भाडं थकीत असल्याने हॉटेल मालकाने सोलापूरचे शिवानंद चलवादी, मुंबईच्या सुलभा मंत्री आमि अर्चना नाईक यांचं सामान लॉज मधून बाहेर काढलं.

त्यानंतर हे परीक्षक टिळक स्मारक मंदीरात आले. नाट्य परिषदेचे पुणे शाखेचे प्रमुख सतिश देसाईंनी त्यांची गाठ घेतली. देसाईंनी ताबडतोब राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांच्याशी फोनवरून संपर्कही साधला. पण या सावळ्या गोंधळाला नेमकं सांस्कृतिक खातं जबाबदार का समाजकल्याण विभाग हा वाद आता रंगला आहे. एकूणच सरकारी गलथानपणाचा नाहक फटका या परीक्षकांना सहन करावा लागतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2011 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close