S M L

पैशाच्या हव्यासापोटीच शेतकर्‍यांचे आंदोलन : नाफेड

16 नोव्हेंबरराज्यभरात पेटलेल्या कापूस आंदोलनावर नाफेडनं आता उलटा सूर लावला आहे. शेतकर्‍यांना यामुद्यावरुन सुरु केलेलं आंदोलन हे अयोग्य असल्याचे मत नाफेडनं व्यक्त केलं आहे. केवळ पैशाच्या हव्यासापोटीच शेतकर्‍यांचे आंदोलन असा आरोपही नाफेडनं केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे हे आंदोलन शंभर टक्के अयोग्य असल्याचे मत नाफेडने केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाजवळ आल्यानंच कापूस उत्पादकांचे हे आंदोलन उभारलं असल्याचं नाफेडचं म्हणणं आहे. हमी भावाच्या खाली किमती उतरल्या तरच नाफेड राज्य कापूस पणन संघाला कापूस खरेदीची परवानगी देईल. आतातरी आम्ही शेतकर्‍यांना मदत करु शकत नाही, अशी आडमुठी भूमिका नाफेडने घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2011 05:15 PM IST

पैशाच्या हव्यासापोटीच शेतकर्‍यांचे आंदोलन : नाफेड

16 नोव्हेंबर

राज्यभरात पेटलेल्या कापूस आंदोलनावर नाफेडनं आता उलटा सूर लावला आहे. शेतकर्‍यांना यामुद्यावरुन सुरु केलेलं आंदोलन हे अयोग्य असल्याचे मत नाफेडनं व्यक्त केलं आहे. केवळ पैशाच्या हव्यासापोटीच शेतकर्‍यांचे आंदोलन असा आरोपही नाफेडनं केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे हे आंदोलन शंभर टक्के अयोग्य असल्याचे मत नाफेडने केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाजवळ आल्यानंच कापूस उत्पादकांचे हे आंदोलन उभारलं असल्याचं नाफेडचं म्हणणं आहे. हमी भावाच्या खाली किमती उतरल्या तरच नाफेड राज्य कापूस पणन संघाला कापूस खरेदीची परवानगी देईल. आतातरी आम्ही शेतकर्‍यांना मदत करु शकत नाही, अशी आडमुठी भूमिका नाफेडने घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2011 05:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close