S M L

विंडीजला हरवून सीरिजवर भारताचा कब्जा

17 नोव्हेंबरकोलकाता टेस्टमध्ये भारताने शानदार विजय मिळवला आहे. भारताने विंडीजला एक इनिंग आणि 15 रन्स राखून पराभूत केलंं. त्याचबरोबर भारताने सीरिजवरही 2-0 असा कब्जा केला. डेरेन ब्राव्हो आणि मार्लन सॅम्युअलनं भारताचा विजय लांबवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 108 रन्सची दणदणीत पार्टनरशिप केली. ब्राव्होनं 136 रन्स केले तर सॅम्युअल 84 रन्स केलं. पण उमेश यादवने ब्राव्होला आऊट केलं आणि ही जोडी फोडली. तर अश्विनने सॅम्युअलला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. यानंतर भारतीय बॉलर्सनं विंडीजची शेपुट जास्त वळवळू दिली नाही. विंडिजची दुसरी इनिंग 463 रन्सवर ऑलआऊट झाली. याचबरोबर भारताने एक इनिंग आणि 15 रन्सनं शानदार विजय मिळवला. भारतातर्फे उमेश यादवने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. भारत आणि वेस्टइंडिजदरम्यानची तिसरी टेस्ट मॅच आता मुंबईत येत्या बावीस तारखेपासून खेळवली जाणार आहे.कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पहिल्या इनिंगमध्ये भारतीय बॅट्समननं खोर्‍यानं रन्स केले. पण त्याच पीचवर वेस्टइंडिजची बॅटिंग मात्र गडगडली. पहिली इनिंग 153 रन्सवर तर दुसरी इनिंग 463 रन्सवर आटोपली. दुसर्‍या इनिंगचा हिरो ठरला तो फास्ट बॉलर उमेश यादवनं. उमेश यादवने 17 ओव्हरमध्ये 80 रन्स देत तब्बल 4 विकेट घेतल्या. पहिल्या इनिंगमध्येही यादवने तीन विकेट घेतल्या होत्या. पहिल्या इनिंगमध्ये एकही विकेट न घेता आलेल्या ईशांत शर्मानं दुसर्‍या इनिंगमध्ये मात्र 2 विकेट घेतल्या. बराथ आणि एडवर्डला आऊट करत त्यानं विंडीजला दुसर्‍या इनिंगमध्ये दणका दिला. पहिल्या इनिंगमध्ये चार विकेट घेणार्‍या प्रग्यान ओझाने दुसर्‍या इनिंगमध्येही कमाल केली. त्यानं दुसर्‍या इनिंगमध्ये 2 विकेट घेतल्या. दिल्ली टेस्ट विजयाचा हिरो ठरलेल्या अश्विननं दुसर्‍या इनिंगमध्ेयही 2 विकेट घेत आपल्या स्पीनची जादू दाखवली. या संपूर्ण मॅचमध्ये अश्विननं 4 विकेट घेतल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2011 09:27 AM IST

विंडीजला हरवून सीरिजवर भारताचा कब्जा

17 नोव्हेंबर

कोलकाता टेस्टमध्ये भारताने शानदार विजय मिळवला आहे. भारताने विंडीजला एक इनिंग आणि 15 रन्स राखून पराभूत केलंं. त्याचबरोबर भारताने सीरिजवरही 2-0 असा कब्जा केला. डेरेन ब्राव्हो आणि मार्लन सॅम्युअलनं भारताचा विजय लांबवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 108 रन्सची दणदणीत पार्टनरशिप केली.

ब्राव्होनं 136 रन्स केले तर सॅम्युअल 84 रन्स केलं. पण उमेश यादवने ब्राव्होला आऊट केलं आणि ही जोडी फोडली. तर अश्विनने सॅम्युअलला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. यानंतर भारतीय बॉलर्सनं विंडीजची शेपुट जास्त वळवळू दिली नाही. विंडिजची दुसरी इनिंग 463 रन्सवर ऑलआऊट झाली. याचबरोबर भारताने एक इनिंग आणि 15 रन्सनं शानदार विजय मिळवला. भारतातर्फे उमेश यादवने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. भारत आणि वेस्टइंडिजदरम्यानची तिसरी टेस्ट मॅच आता मुंबईत येत्या बावीस तारखेपासून खेळवली जाणार आहे.

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पहिल्या इनिंगमध्ये भारतीय बॅट्समननं खोर्‍यानं रन्स केले. पण त्याच पीचवर वेस्टइंडिजची बॅटिंग मात्र गडगडली. पहिली इनिंग 153 रन्सवर तर दुसरी इनिंग 463 रन्सवर आटोपली. दुसर्‍या इनिंगचा हिरो ठरला तो फास्ट बॉलर उमेश यादवनं. उमेश यादवने 17 ओव्हरमध्ये 80 रन्स देत तब्बल 4 विकेट घेतल्या.

पहिल्या इनिंगमध्येही यादवने तीन विकेट घेतल्या होत्या. पहिल्या इनिंगमध्ये एकही विकेट न घेता आलेल्या ईशांत शर्मानं दुसर्‍या इनिंगमध्ये मात्र 2 विकेट घेतल्या. बराथ आणि एडवर्डला आऊट करत त्यानं विंडीजला दुसर्‍या इनिंगमध्ये दणका दिला. पहिल्या इनिंगमध्ये चार विकेट घेणार्‍या प्रग्यान ओझाने दुसर्‍या इनिंगमध्येही कमाल केली. त्यानं दुसर्‍या इनिंगमध्ये 2 विकेट घेतल्या. दिल्ली टेस्ट विजयाचा हिरो ठरलेल्या अश्विननं दुसर्‍या इनिंगमध्ेयही 2 विकेट घेत आपल्या स्पीनची जादू दाखवली. या संपूर्ण मॅचमध्ये अश्विननं 4 विकेट घेतल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2011 09:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close