S M L

कापसाला हमीभाव देण्याबाबत ठोस निर्णय नाहीच !

17 नोव्हेंबरकापूसप्रश्नी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलवलेल्या तातडीच्या बैठकीत कुठलाही ठोस निर्णय झालाच नाही. मंत्रालयात झालेल्या या बैठकीत कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा आढावा घेतला गेला. त्याचबरोबर कापसाला हमीभाव वाढवून दिला तर सरकारवर पडणार्‍या अतिरिक्त भाराचीच चर्चा बैठकीत झाली. फक्त शेतकर्‍याला हेक्टरी 5, 000 रुपये अनुदान देता येईल का याविषयी चर्चा करण्यात आली आणि एवढीच काय ती बैठकीत सकारात्मक बाजू होती. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देता येईल असं काहीही या बैठकीतून निष्पन्न झालं नाही. त्यामुळे सरकार आता कापसाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची शक्यता आहे. या बैठकीत सत्ताधरी विरोधकांसमोर कापसाच्या हमीभावाविषयी त्यांच्या अडचणी सांगणार आहे. ऊसापाठोपाठ कापसाच्या आंदोलनानंही सरकार चांगलचे अडचणीत आलं आहे. त्यामुळे आता सगळ्या पक्षांना विचारात घेऊन भूमिका मांडायचा सरकारचा विचार दिसतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2011 10:03 AM IST

कापसाला हमीभाव देण्याबाबत ठोस निर्णय नाहीच !

17 नोव्हेंबर

कापूसप्रश्नी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलवलेल्या तातडीच्या बैठकीत कुठलाही ठोस निर्णय झालाच नाही. मंत्रालयात झालेल्या या बैठकीत कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा आढावा घेतला गेला. त्याचबरोबर कापसाला हमीभाव वाढवून दिला तर सरकारवर पडणार्‍या अतिरिक्त भाराचीच चर्चा बैठकीत झाली. फक्त शेतकर्‍याला हेक्टरी 5, 000 रुपये अनुदान देता येईल का याविषयी चर्चा करण्यात आली आणि एवढीच काय ती बैठकीत सकारात्मक बाजू होती. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देता येईल असं काहीही या बैठकीतून निष्पन्न झालं नाही. त्यामुळे सरकार आता कापसाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची शक्यता आहे. या बैठकीत सत्ताधरी विरोधकांसमोर कापसाच्या हमीभावाविषयी त्यांच्या अडचणी सांगणार आहे. ऊसापाठोपाठ कापसाच्या आंदोलनानंही सरकार चांगलचे अडचणीत आलं आहे. त्यामुळे आता सगळ्या पक्षांना विचारात घेऊन भूमिका मांडायचा सरकारचा विचार दिसतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2011 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close