S M L

उरणच्या खाडीत लाखो मासे मृत अवस्थेत आढळली

17 नोव्हेंबररायगड जिल्ह्यातील उरण इथं फुंडे गावाजवळच्या खाडीत लाखो मासे मरून पडले आहे. त्यामुळे गावकर्‍यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पाणजे समुद्रकिनार्‍यापासून अडीच किलोमीटर आत खाडीत हे मासे होते. सकाळी भरतीचं पाणी ओसरल्यानंतर खाडीच्या किनार्‍यावर माश्यांचा खच पडला होता. तर पाण्याला केमिकल मिशि्रत वास येत होता. त्यामुळे खाडीतल्या केमिकल मिशि्रत पाण्यामुळेच हे मासे मेले असल्याचा आरोप स्थानिक गावकर्‍यांनी केला. घटनास्थळी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी पोहचेले असून प्रयोग शाळेत तपासणीसाठी इथले मासे आणि पाण्याचे नमुने पाठवण्यात आले आहे. जोपर्यंत तपासणी अहवाल येत नाही तोपर्यंत मासे खाऊ नये असा सल्ला अधिकार्‍यांकडून देण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2011 11:02 AM IST

उरणच्या खाडीत लाखो मासे मृत अवस्थेत आढळली

17 नोव्हेंबर

रायगड जिल्ह्यातील उरण इथं फुंडे गावाजवळच्या खाडीत लाखो मासे मरून पडले आहे. त्यामुळे गावकर्‍यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पाणजे समुद्रकिनार्‍यापासून अडीच किलोमीटर आत खाडीत हे मासे होते. सकाळी भरतीचं पाणी ओसरल्यानंतर खाडीच्या किनार्‍यावर माश्यांचा खच पडला होता. तर पाण्याला केमिकल मिशि्रत वास येत होता. त्यामुळे खाडीतल्या केमिकल मिशि्रत पाण्यामुळेच हे मासे मेले असल्याचा आरोप स्थानिक गावकर्‍यांनी केला. घटनास्थळी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी पोहचेले असून प्रयोग शाळेत तपासणीसाठी इथले मासे आणि पाण्याचे नमुने पाठवण्यात आले आहे. जोपर्यंत तपासणी अहवाल येत नाही तोपर्यंत मासे खाऊ नये असा सल्ला अधिकार्‍यांकडून देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2011 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close