S M L

कोलकाता टेस्टवर भारताची मजबूत पकड

16 नोव्हेंबरकोलकाता टेस्टवर भारताने मजबूत पकड मिळवली आहे आणि विजयापासून टीम इंडिया आता फक्त 7 विकेट दूर आहे. फॉलोअन घेऊन खेळणारी वेस्ट इंडिज अजूनही 283 रन्सनं पिछाडीवर आहे. कोलकाता टेस्टच्या तिसर्‍या दिवसाची सुरुवात नेहमीपेक्षा लवकरच झाली. 2 विकेट आणि 34 रन्सवरुन विंडीजनं खेळ पुढे सुरु केला. पण त्यांची सुरुवातच पडझडीनं झाली. भारतीय स्पीन बॉलर्सने पाहुण्यांना दणका दिला. ओझाने कर्क एडवर्डची विकेट घेतली, तर अश्विनने चंद्रपॉलला आऊट केलं, विंडीजची स्थिती होती 4 विकेटवर 46 रन्स. डेरेन ब्राव्हो आणि मार्लन सॅम्युअलनं पाचव्या विकेटसाठी 46 रन्सची पार्टनरशिप करत इनिंग सावरण्याच प्रयत्न केला. पण अवघ्या 7 रन्सच्या अंतराने उमेश यादवने दोघांनाही पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. विंडीजच्या तळाच्या बॅट्समनने इनिंग लांबण्याचा प्रयत्न केला खरा पण प्रग्यान ओझाने विंडीज शेपुट जास्त वळवळू दिली नाही. विंडीजची पहिली इनिंग अवघ्या 153 रन्सवर ऑलआऊट झाली. 484 रन्सची आघाडी घेत भारतानं विंडीजवर फॉलोअन लादला. विंडीजची दुसर्‍या इनिंगची सुरुवातही खराब झाली. 9 रन्सवर खेळणार्‍या ब्रेथवेटला उमेश यादवनं आऊट केलं. पण पहिल्या इनिंगमध्ये कच खालेली विंडिजची बॅटिंग दुसर्‍या इनिंमध्ये काहीशी सावरली. ऍड्रीयन बराथ आणि कर्क एडवर्डने दुसर्‍या इनिंगमध्ये भक्कम पार्टनरशिप करत विंडीजला शंभर रन्सचा टप्पा पार करुन दिला. ही जोडी भारतीय टीमसाठी डोकेदुखी ठरणार असं वाटत असतानाच ईशांत शर्माने बराथची विकेट घेतली. बराथनं 62 रन्स केले. पाठोपाठ ईशांत शर्मानंच 60 रन्सवर खेळणार्‍या एडवर्डलाही एलबीडब्ल्यू केलं. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विंडीज 3 विकेट गमावत 195 रन्स केलेत. पण विंडीजची आणखी 283 रन्सनं पिछाडीवर आहे आणि भारतीय टीमचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पहिल्या इनिंगमध्ये भारतीय बॅट्समननं खोर्‍यानं रन्स केले. पण त्याच पीचवर वेस्टइंडिजची बॅटिंग मात्र गडगडली. फक्त 153 रन्समध्ये विंडीजची पहिली इनिंग गारद झाली. याची सुरुवात केली ती फास्ट बॉलर उमेश यादवनं. ऍड्रीयन बराथला आऊट करत उमेश यादवनं भारताला ब्रेक थ्रु मिळवून दिला. तर डेरेन ब्राव्हो आणि मार्लन सॅम्युअला त्याने क्लिन बोल्ड करत विंडीजच्या आक्रमणातली हवाच काढून टाकली. उमेश यादवनं 7 ओव्हरमध्ये फक्त 23 रन्स देत 3 विकेट घेतल्या. पण पहिल्या इनिंगचा हिरो ठरला तो स्पीनर प्रग्यान ओझा. दिल्ली टेस्टप्रमाणेच ओझानं कोलकाता टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या. कर्क एडवर्डला आऊट करत त्याने पहिली विकेट घेतली. तर फिडेल एडवर्डला आऊट करत त्यानं विंडिजच्या इनिंगला फुलस्टॉप लावला. ओझाने 22 ओव्हरमध्ये 64 रन्स देत 4 विकेट घेतल्या. दिल्ली टेस्ट विजयाचा हिरो ठरलेल्या अश्विनने दुसर्‍या टेस्ट मॅचमध्येही 2 विकेट घेत आपल्या स्पीनची जादू दाखवली. अश्विनने 14 ओव्हरमध्ये 49 रन्स देत 2 विकेट घेतल्या. पहिल्या इनिंगमध्ये एकही विकेट न घेता आलेल्या ईशांत शर्मानं दुसर्‍या इनिंगमध्ये मात्र 2 विकेट घेतल्या. बराथ आणि एडवर्डला आऊट करत त्याने विंडीजला दुसर्‍या इनिंगमध्ये दणका दिला. वेस्टइंडिजने दुसर्‍या इनिंगमध्ये फायटिंग स्पिरिट दाखवलं. भारताचा विजय निश्चित असला तरी मोठया विजयापासून दूर ठेवण्यासाठी विंडीजचे बॅट्समन सरसावलेत. दुसर्‍या इनिंगमध्ये ऍड्रीयन बराथ आणि कर्क एडवर्डने दुसर्‍या विकेटसाठी 93 रन्सची पार्टनरशिप करत इनिंग सावरली. बराथनं 62 रन्स केले यात त्यानं 10 फोर मारले. तर एडवर्डनं 60 रन्स करत त्याला चांगली साथ दिली. तिसर्‍या दिवस अखेर डेरेन ब्राव्हो 38 रन्सवर नॉटआऊट आहे. तर विंडीजचा प्रमुख बॅट्समन शिवनारायन चंद्रपॉल 21 रन्सवर खेळतोय. आता ही जोडी मॅचच्या चौथ्या दिवशी आणखी किती काळ मैदानावर उभी राहतेय यावर भारतीय टीमचा विजय अवलंबून असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2011 03:14 PM IST

कोलकाता टेस्टवर भारताची मजबूत पकड

16 नोव्हेंबर

कोलकाता टेस्टवर भारताने मजबूत पकड मिळवली आहे आणि विजयापासून टीम इंडिया आता फक्त 7 विकेट दूर आहे. फॉलोअन घेऊन खेळणारी वेस्ट इंडिज अजूनही 283 रन्सनं पिछाडीवर आहे. कोलकाता टेस्टच्या तिसर्‍या दिवसाची सुरुवात नेहमीपेक्षा लवकरच झाली. 2 विकेट आणि 34 रन्सवरुन विंडीजनं खेळ पुढे सुरु केला. पण त्यांची सुरुवातच पडझडीनं झाली.

भारतीय स्पीन बॉलर्सने पाहुण्यांना दणका दिला. ओझाने कर्क एडवर्डची विकेट घेतली, तर अश्विनने चंद्रपॉलला आऊट केलं, विंडीजची स्थिती होती 4 विकेटवर 46 रन्स. डेरेन ब्राव्हो आणि मार्लन सॅम्युअलनं पाचव्या विकेटसाठी 46 रन्सची पार्टनरशिप करत इनिंग सावरण्याच प्रयत्न केला. पण अवघ्या 7 रन्सच्या अंतराने उमेश यादवने दोघांनाही पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला.

विंडीजच्या तळाच्या बॅट्समनने इनिंग लांबण्याचा प्रयत्न केला खरा पण प्रग्यान ओझाने विंडीज शेपुट जास्त वळवळू दिली नाही. विंडीजची पहिली इनिंग अवघ्या 153 रन्सवर ऑलआऊट झाली. 484 रन्सची आघाडी घेत भारतानं विंडीजवर फॉलोअन लादला. विंडीजची दुसर्‍या इनिंगची सुरुवातही खराब झाली. 9 रन्सवर खेळणार्‍या ब्रेथवेटला उमेश यादवनं आऊट केलं. पण पहिल्या इनिंगमध्ये कच खालेली विंडिजची बॅटिंग दुसर्‍या इनिंमध्ये काहीशी सावरली.

ऍड्रीयन बराथ आणि कर्क एडवर्डने दुसर्‍या इनिंगमध्ये भक्कम पार्टनरशिप करत विंडीजला शंभर रन्सचा टप्पा पार करुन दिला. ही जोडी भारतीय टीमसाठी डोकेदुखी ठरणार असं वाटत असतानाच ईशांत शर्माने बराथची विकेट घेतली. बराथनं 62 रन्स केले. पाठोपाठ ईशांत शर्मानंच 60 रन्सवर खेळणार्‍या एडवर्डलाही एलबीडब्ल्यू केलं. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विंडीज 3 विकेट गमावत 195 रन्स केलेत. पण विंडीजची आणखी 283 रन्सनं पिछाडीवर आहे आणि भारतीय टीमचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पहिल्या इनिंगमध्ये भारतीय बॅट्समननं खोर्‍यानं रन्स केले. पण त्याच पीचवर वेस्टइंडिजची बॅटिंग मात्र गडगडली. फक्त 153 रन्समध्ये विंडीजची पहिली इनिंग गारद झाली. याची सुरुवात केली ती फास्ट बॉलर उमेश यादवनं. ऍड्रीयन बराथला आऊट करत उमेश यादवनं भारताला ब्रेक थ्रु मिळवून दिला. तर डेरेन ब्राव्हो आणि मार्लन सॅम्युअला त्याने क्लिन बोल्ड करत विंडीजच्या आक्रमणातली हवाच काढून टाकली.

उमेश यादवनं 7 ओव्हरमध्ये फक्त 23 रन्स देत 3 विकेट घेतल्या. पण पहिल्या इनिंगचा हिरो ठरला तो स्पीनर प्रग्यान ओझा. दिल्ली टेस्टप्रमाणेच ओझानं कोलकाता टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या. कर्क एडवर्डला आऊट करत त्याने पहिली विकेट घेतली. तर फिडेल एडवर्डला आऊट करत त्यानं विंडिजच्या इनिंगला फुलस्टॉप लावला. ओझाने 22 ओव्हरमध्ये 64 रन्स देत 4 विकेट घेतल्या. दिल्ली टेस्ट विजयाचा हिरो ठरलेल्या अश्विनने दुसर्‍या टेस्ट मॅचमध्येही 2 विकेट घेत आपल्या स्पीनची जादू दाखवली.

अश्विनने 14 ओव्हरमध्ये 49 रन्स देत 2 विकेट घेतल्या. पहिल्या इनिंगमध्ये एकही विकेट न घेता आलेल्या ईशांत शर्मानं दुसर्‍या इनिंगमध्ये मात्र 2 विकेट घेतल्या. बराथ आणि एडवर्डला आऊट करत त्याने विंडीजला दुसर्‍या इनिंगमध्ये दणका दिला. वेस्टइंडिजने दुसर्‍या इनिंगमध्ये फायटिंग स्पिरिट दाखवलं. भारताचा विजय निश्चित असला तरी मोठया विजयापासून दूर ठेवण्यासाठी विंडीजचे बॅट्समन सरसावलेत.

दुसर्‍या इनिंगमध्ये ऍड्रीयन बराथ आणि कर्क एडवर्डने दुसर्‍या विकेटसाठी 93 रन्सची पार्टनरशिप करत इनिंग सावरली. बराथनं 62 रन्स केले यात त्यानं 10 फोर मारले. तर एडवर्डनं 60 रन्स करत त्याला चांगली साथ दिली. तिसर्‍या दिवस अखेर डेरेन ब्राव्हो 38 रन्सवर नॉटआऊट आहे. तर विंडीजचा प्रमुख बॅट्समन शिवनारायन चंद्रपॉल 21 रन्सवर खेळतोय. आता ही जोडी मॅचच्या चौथ्या दिवशी आणखी किती काळ मैदानावर उभी राहतेय यावर भारतीय टीमचा विजय अवलंबून असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2011 03:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close