S M L

कापूस आंदोलन : वाशीममध्ये मनसेचा रास्ता रोको

17 नोव्हेंबरवाशीम जिल्ह्यात तिसर्‍या दिवशीही कापूस प्रश्नावर आंदोलन सुरुच आहे. कारंजा दत्तमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी, नागपूर- वाशीम रोड 1 तास रोखून धरला. कापूस आणि सोयाबीनला वाढीव हमीभाव देण्याची मागणी कार्यकर्त्यांची आहे. कारंजा लाड इथ हे आंदोलन झालं. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळले, यावेळी 100 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि काही वेळानंतर सोडून दिलं. तर दुसरीकडे अमरावतीमध्ये शरद पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस उजाडला. उपोषणामुळे राणांची तब्येत बिघडली आहे. तर रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौरही शेकडो महिला कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसल्या आहेत. दरम्यान, रवी राणा सोबत अनेक कार्यकर्ते आणि कैदीही उपोषणाला बसले आहेत. त्यातल्या 5 कार्यकर्त्यांची तब्येत खालवल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2011 11:34 AM IST

कापूस आंदोलन : वाशीममध्ये मनसेचा रास्ता रोको

17 नोव्हेंबर

वाशीम जिल्ह्यात तिसर्‍या दिवशीही कापूस प्रश्नावर आंदोलन सुरुच आहे. कारंजा दत्तमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी, नागपूर- वाशीम रोड 1 तास रोखून धरला. कापूस आणि सोयाबीनला वाढीव हमीभाव देण्याची मागणी कार्यकर्त्यांची आहे. कारंजा लाड इथ हे आंदोलन झालं. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळले, यावेळी 100 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि काही वेळानंतर सोडून दिलं. तर दुसरीकडे अमरावतीमध्ये शरद पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस उजाडला. उपोषणामुळे राणांची तब्येत बिघडली आहे. तर रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौरही शेकडो महिला कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसल्या आहेत. दरम्यान, रवी राणा सोबत अनेक कार्यकर्ते आणि कैदीही उपोषणाला बसले आहेत. त्यातल्या 5 कार्यकर्त्यांची तब्येत खालवल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2011 11:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close