S M L

ज्येष्ठ समाजवादी नेते बापूसाहेब काळदाते यांच्यावर अंत्यसंस्कार

17 नोव्हेंबरज्येष्ठ समाजवादी नेते माजी खासदार बापुसाहेब काळदाते यांचं मध्यरात्री औरंगाबादमध्ये निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्यावर आज संध्याकाळी औरंगाबादमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून ते किडनीच्या आजारानं त्रस्त होते. त्यांना उपचारासाठी औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असतानाच ह्रदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचं निधन झालं. त्यांच्या अंतिम इछेनुसार त्यांचे नेत्रदान करण्यात आलं.बीडमध्ये जन्मलेल्या बापूंनी आयुर्वेदात वैद्यकीय शिक्षण घेतलं. साने गुरुजी, एसएम जोशी यांची व्याख्याने तसेच राममनोहर लोहीया यांच्या विचांतून त्यांची समाजवादी विचारांची बैठक आकाराला आली. आणीबाणी तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळ यात त्यांचा मोठा सहभाग होता.1967 ला लातुर विधानसभा मतदार संघातून पहिली निवडणूक जिंकली. आणीबाणीनंतर त्यांना औरंगाबाद मतदार संघातुन जनतेनं दिल्लीला पाठवलं. ते दोन वेळा राज्यसभेवरही निवडुन गेले होते. प्रभावी वक्ता अशी त्यांची ख्याती होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2011 03:22 PM IST

ज्येष्ठ समाजवादी नेते बापूसाहेब काळदाते यांच्यावर अंत्यसंस्कार

17 नोव्हेंबर

ज्येष्ठ समाजवादी नेते माजी खासदार बापुसाहेब काळदाते यांचं मध्यरात्री औरंगाबादमध्ये निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्यावर आज संध्याकाळी औरंगाबादमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून ते किडनीच्या आजारानं त्रस्त होते. त्यांना उपचारासाठी औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असतानाच ह्रदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचं निधन झालं.

त्यांच्या अंतिम इछेनुसार त्यांचे नेत्रदान करण्यात आलं.बीडमध्ये जन्मलेल्या बापूंनी आयुर्वेदात वैद्यकीय शिक्षण घेतलं. साने गुरुजी, एसएम जोशी यांची व्याख्याने तसेच राममनोहर लोहीया यांच्या विचांतून त्यांची समाजवादी विचारांची बैठक आकाराला आली. आणीबाणी तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळ यात त्यांचा मोठा सहभाग होता.1967 ला लातुर विधानसभा मतदार संघातून पहिली निवडणूक जिंकली. आणीबाणीनंतर त्यांना औरंगाबाद मतदार संघातुन जनतेनं दिल्लीला पाठवलं. ते दोन वेळा राज्यसभेवरही निवडुन गेले होते. प्रभावी वक्ता अशी त्यांची ख्याती होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2011 03:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close