S M L

शिवसेनेचा रेशन ऑफिसवर मोर्चा

17 नोव्हेंबरशिवसेनेच्या दादर विभागातर्फे आज रेशनकार्ड ऑफिस आणि महापालिकेच्या जी नॉर्थ वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढण्यात आला. सिद्धीविनायक मंदिराजवळ असलेल्या नर्दुल्ला टँक मैदानात उघड्यावर संसार मांडलेल्या अनेक बेघर लोकांना काँग्रेसतर्फे बोगस रेशनकार्ड दिली जातायत असा आरोप करत शिवसेनेने ही रेशनकार्ड रद्द करण्याची मागणी केली. शासनाच्या बेघर अंत्योदय योजनेच्या माध्यमातून रेशनकार्ड दिले जातायत आणि याच रेशनकार्डांद्वारे बोगस मतदार तयार केले जात आहे. असा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला. दोनच दिवसांपुर्वी रात्री दहानंतर शासकीय अधिकार्‍यांतर्फे या मैदानाच्या फुटपाथवर राहाणार्‍यांचे रेशनकार्ड देण्यासाठी तपासणी करण्यात आली, याकडेही शिवसेनेने संबंधित अधिकार्‍यांचे लक्ष वेधलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2011 05:19 PM IST

शिवसेनेचा रेशन ऑफिसवर मोर्चा

17 नोव्हेंबर

शिवसेनेच्या दादर विभागातर्फे आज रेशनकार्ड ऑफिस आणि महापालिकेच्या जी नॉर्थ वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढण्यात आला. सिद्धीविनायक मंदिराजवळ असलेल्या नर्दुल्ला टँक मैदानात उघड्यावर संसार मांडलेल्या अनेक बेघर लोकांना काँग्रेसतर्फे बोगस रेशनकार्ड दिली जातायत असा आरोप करत शिवसेनेने ही रेशनकार्ड रद्द करण्याची मागणी केली. शासनाच्या बेघर अंत्योदय योजनेच्या माध्यमातून रेशनकार्ड दिले जातायत आणि याच रेशनकार्डांद्वारे बोगस मतदार तयार केले जात आहे. असा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला. दोनच दिवसांपुर्वी रात्री दहानंतर शासकीय अधिकार्‍यांतर्फे या मैदानाच्या फुटपाथवर राहाणार्‍यांचे रेशनकार्ड देण्यासाठी तपासणी करण्यात आली, याकडेही शिवसेनेने संबंधित अधिकार्‍यांचे लक्ष वेधलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2011 05:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close