S M L

पुण्यात टेकड्यांवरुन राष्ट्रवादीत मतभेद !

अद्वैत मेहता, पुणे 19 नोव्हेंबरपुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट केलेल्या गावांमधल्या मुद्यांवरुन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये काही एकमत व्हायला तयार नाही. अजित पवारांनी 4 टक्के बांधकामाची भुमिका बदलली. आता त्यांनी पर्यावरणवादी हरित विकास आराखड्याची घेतलेली भुमिका राष्ट्रवादीच्याच काही नगरसेवकांना रुचलेली नाही. त्यातच काँग्रेसच्या पतंगराव कदमांनी अजित पवारांनी 4 टक्के नाही तर 20 टक्के बांधकामाची भुमिका मांडली होती, असं सांगत मुख्यमंत्री सांगतील ते खरं असं म्हणत राष्ट्रवादीच्या दुखर्‍या नसेवर बोट ठेवलं आहे.पुण्यातल्या काँग्रेसच्या मेळाव्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ग्रीन डीपीची भुमिका बदलत टेकड्यांवरील 4 टक्के बांधकामाला परवानगी देऊन सगळ्यांना धक्काच दिला होता. त्यानंतर अजित पवारांनी शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांच्या सूरात सूर मिसळत ग्रीन डीपीला पाठिंबा दिला. पण राष्ट्रवादीतल्या एका गटाला अजितदादांचा हा निर्णय रुचलेला नाही. त्यामुळे पक्षातले मतभेद चव्हाट्यावर येऊ लागलेत. त्यातच महापौर बंगल्यावरील बैठकीत यावर गरमागरम चर्चाही झाली. बांधकाम विरहित टेकड्यांच्या मुद्यावर शहराध्यक्षा वंदना चव्हाण मात्र ठाम आहेत.महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते सुभाष जगताप यांना मीडियाशी फार बोलू नका अशी तंबी मिळाल्याने त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही. तर याच मुद्यावरुन काँग्रेस नेते पतंगराव कदम यांनी राष्ट्रवादीला चागलंच फटकारलं. खरंतर अजित पवारांच्या हरित विकास आराखड्याला आणि भूमिगत मेट्रो या पर्यावरणाशी सुसंगत, तसेच पुणेकरांना भावणार्‍या भुमिका घेतल्या आहेत. पण यातल्या हरित विकास आराखड्याला त्यांच्याच पक्षातून, मेट्रोला काँग्रेसकडून विरोध होतोय. निवडणुका जसजशा जवळ येताहेत, त्याप्रमाणे पुणेकरांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर राजकीय पक्षांच्या भुमिकांमध्ये आश्चर्यकाररित्या बदल होताना दिसतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2011 11:07 AM IST

पुण्यात टेकड्यांवरुन राष्ट्रवादीत मतभेद !

अद्वैत मेहता, पुणे

19 नोव्हेंबर

पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट केलेल्या गावांमधल्या मुद्यांवरुन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये काही एकमत व्हायला तयार नाही. अजित पवारांनी 4 टक्के बांधकामाची भुमिका बदलली. आता त्यांनी पर्यावरणवादी हरित विकास आराखड्याची घेतलेली भुमिका राष्ट्रवादीच्याच काही नगरसेवकांना रुचलेली नाही. त्यातच काँग्रेसच्या पतंगराव कदमांनी अजित पवारांनी 4 टक्के नाही तर 20 टक्के बांधकामाची भुमिका मांडली होती, असं सांगत मुख्यमंत्री सांगतील ते खरं असं म्हणत राष्ट्रवादीच्या दुखर्‍या नसेवर बोट ठेवलं आहे.

पुण्यातल्या काँग्रेसच्या मेळाव्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ग्रीन डीपीची भुमिका बदलत टेकड्यांवरील 4 टक्के बांधकामाला परवानगी देऊन सगळ्यांना धक्काच दिला होता. त्यानंतर अजित पवारांनी शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांच्या सूरात सूर मिसळत ग्रीन डीपीला पाठिंबा दिला. पण राष्ट्रवादीतल्या एका गटाला अजितदादांचा हा निर्णय रुचलेला नाही. त्यामुळे पक्षातले मतभेद चव्हाट्यावर येऊ लागलेत. त्यातच महापौर बंगल्यावरील बैठकीत यावर गरमागरम चर्चाही झाली. बांधकाम विरहित टेकड्यांच्या मुद्यावर शहराध्यक्षा वंदना चव्हाण मात्र ठाम आहेत.

महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते सुभाष जगताप यांना मीडियाशी फार बोलू नका अशी तंबी मिळाल्याने त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही. तर याच मुद्यावरुन काँग्रेस नेते पतंगराव कदम यांनी राष्ट्रवादीला चागलंच फटकारलं. खरंतर अजित पवारांच्या हरित विकास आराखड्याला आणि भूमिगत मेट्रो या पर्यावरणाशी सुसंगत, तसेच पुणेकरांना भावणार्‍या भुमिका घेतल्या आहेत. पण यातल्या हरित विकास आराखड्याला त्यांच्याच पक्षातून, मेट्रोला काँग्रेसकडून विरोध होतोय. निवडणुका जसजशा जवळ येताहेत, त्याप्रमाणे पुणेकरांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर राजकीय पक्षांच्या भुमिकांमध्ये आश्चर्यकाररित्या बदल होताना दिसतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2011 11:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close