S M L

इंदूर वन डेत युसूफ पठाणही चमकला

18 नोव्हेंबर नेहा बेदी इंग्लंडविरुध्दच्या दुस-या वन डेत युवराज बरोबर आणखी एक बॅटसमन चमकला, आणि तो म्हणजे युसूफ पठाण.इरफान पठाण इतका तो अजून प्रसिद्ध नाही. आज इरफान भारतीय टीममध्ये कमबॅक करण्यासाठी झगडतोय तर युसूफ टीममध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करण्याच्या प्रयत्नात आहे. इंदूर वन डेतील त्याच्या खेळीचं कौतुक करण्यास त्याचे टीम सहकारी थकत नव्हते. कारण युसूफची कामगिरीच तशी होती.त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी वन डे मधली त्याची पहिली वहिली हाफ सेंच्युरी तर त्याने ठोकलीच.शिवाय टीमचा स्कोअर तीनशेच्या जवळ नेऊन ठेवण्याची मोठी कामगिरी त्यानं पार पाडली. आयपीेलमधल्या त्याच्या धुवाधार कामगिरीमुळे त्याची भारतीय टीममध्ये निवड झाली. आणि आयपीएलसारखीच कामगिरी भारतीय टीमसाठी करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. शेवटच्या ओव्हर्समध्ये हाणामारी करून रन वाढवणं ही युसूफची खासियत आहे. शिवाय त्याची ऑफ स्पीन बॉलिंगही टीमला उपयोगी पडणारी आहे. आणि तो एक भरवशाचा फिल्डरही आहे. युसूफ पठाणनं इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. पण आता त्याच्यासमोर आव्हान आहे ते टीममधलं स्थान टिकवण्याचं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 18, 2008 05:54 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2008 05:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close