S M L

कांद्याचा किमान निर्यात दर रद्द करा - खासदार समीर भुजबळ

18 नोव्हेंबर, दिल्लीवेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजारपेठांत खरीप कांद्याची आवक सुरू झालीय. त्यातच गेल्या हंगामातला उन्हाळी कांदाही बाजारात येत आहे. त्यामुळे शेतक-यांना उत्पादन खर्जचापेक्षा कमी भाव मिळत आहे. याच मुद्द्यावर खासदार समीर भुजबळ यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री के. व्ही. थॉमस यांची भेट घेतली. त्यावर सोमवारी मंत्रिगटाच्या बैठकीत शेतक-यांच्या हिताचा निर्णय घेऊ, असं आश्वासन थॉमस यांनी दिलंय. कांद्याचा किमान निर्यात दरच रद्द करावा, अशी मागणी समीर भुजबळ यांनी केलीय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चीन, पाकिस्तान आणि इतर कांदा उत्पादक देशांचा किमान निर्यात दर भारतापेक्षा कमी आहे. अरब देशांत भारतीय कांद्याला मागणी आहे. पण ज्यादा निर्यात दरामुळे निर्यातदार कांदा खरेदी करू शकत नाहीत. आणि त्याचा फटका शेतक-यांना बसतोय. सध्या कांद्याचा निर्यात दर 475 डॉलर प्रति टन असून हा दर कमी न केल्यानं नाशिकमध्ये घाऊक बाजारात कांद्याचे दर कोसळत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 18, 2011 01:48 PM IST

कांद्याचा किमान निर्यात दर रद्द करा - खासदार समीर भुजबळ

18 नोव्हेंबर, दिल्ली

वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजारपेठांत खरीप कांद्याची आवक सुरू झालीय. त्यातच गेल्या हंगामातला उन्हाळी कांदाही बाजारात येत आहे. त्यामुळे शेतक-यांना उत्पादन खर्जचापेक्षा कमी भाव मिळत आहे. याच मुद्द्यावर खासदार समीर भुजबळ यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री के. व्ही. थॉमस यांची भेट घेतली. त्यावर सोमवारी मंत्रिगटाच्या बैठकीत शेतक-यांच्या हिताचा निर्णय घेऊ, असं आश्वासन थॉमस यांनी दिलंय. कांद्याचा किमान निर्यात दरच रद्द करावा, अशी मागणी समीर भुजबळ यांनी केलीय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चीन, पाकिस्तान आणि इतर कांदा उत्पादक देशांचा किमान निर्यात दर भारतापेक्षा कमी आहे. अरब देशांत भारतीय कांद्याला मागणी आहे. पण ज्यादा निर्यात दरामुळे निर्यातदार कांदा खरेदी करू शकत नाहीत. आणि त्याचा फटका शेतक-यांना बसतोय. सध्या कांद्याचा निर्यात दर 475 डॉलर प्रति टन असून हा दर कमी न केल्यानं नाशिकमध्ये घाऊक बाजारात कांद्याचे दर कोसळत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2011 01:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close