S M L

मधल्या फळीतला हुकमी एक्का युवराज सिंग

18 नोव्हेंबरसमीर सावंतइंग्लंडविरुध्द सुरू असलेल्या वनडे सीरिजमध्ये युवराजच्या बॅटिंगचा धडाका सुरू आहे. युवराज संपलाय अशी ओरड करणा-यांना त्यानं आपल्या बॅटनं चोख उत्तर दिलं. इतकंच नाही तर आता त्यानं भारतीय टेस्ट टीममध्येही आपल्या नावाचा विचार करायला निवड समितीला भाग पाडलंय. पंजाबच्या या किंगकडे सर्व काही आहे. अ‍ॅटिट्यूड, सौंदर्य, आणि भरपूर आत्मविश्वास. आता त्याच्या वन डेतल्या तुफान कामगिरीनं भारतीय निवड समितीलाही त्याचा टेस्टसाठी विचार करणं भागं पडलं. निवड समितीचे अध्यक्ष श्रीकांतही त्याच्यावर भलतेच खूश आहेत. त्यांनी तर टेस्ट टीममध्येही त्याला संधी देण्याचं सुतोवाच केलंय. सौरव गांगुलीच्या निवृत्तीमुळे टेस्ट टीममध्ये एक जागा रिकामी झाली आहे. इंग्लंडविरुध्द सलग दोन सेंच्युरी मारून युवराजनं आपण फॉर्ममध्ये असल्याचं दाखवून दिलंय.सचिन, द्रविड, गांगुली आणि लक्ष्मण या भारताच्या एकेकाळच्या भक्कम मधल्या फळीचं करिअर जवळपास संपुष्टात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या जागा आता नवीन खेळाडूंसाठी खुल्या आहेत. चांगल्या कामगिरीचं प्रदर्शन करत रोहीत शर्मा, सुरेश रैना आणि एस. बद्रीनाथ यांनीही आपली दावेदारी सिद्धही केली आहे. लागोपाठ चांगल्या कामगिरीचं प्रदर्शन करत युवराजनेही आपली उपयुक्तता दाखवून दिली आहे. पण आता युवराज स्वत:ही कामगिरीत सातत्य राखण्यासाठी उत्सुक आहे. तो आता 26 वर्षांचा आहे. आपल्या टेस्ट करियरमध्ये तो फक्त 23 टेस्ट खेळलाय. आणि यात त्यानं तीन सेंच्युरीसह 1 हजार 50 रन्स केले आहेत. इंग्लंडविरुध्दच्या दोन टेस्ट मॅचमध्येही युवराजचा हाच फॉर्म कायम राहिला तर भारतीय टीमला मधल्या फळीतला एक हुकमी एक्का नक्कीच मिळेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 18, 2008 06:09 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2008 06:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close