S M L

आता सुट्टीच्या दिवशी मतदान बंद

20 नोव्हेंबरसध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगानंही आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंयतींसाठी मतदान रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी न ठेवताकामकाजाच्या दिवशी ठेवलं जाणार आहे. सोयीनुसार मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याचा निर्णय याआधी निवडणूक आयोगाने घेतला होता. पण मतदानाची टक्केवारी वाढण्याऐवजी कमी झाल्याने आता कामकाजाच्या दिवशी मतदान ठेवलं जाणार आहे. त्याची सुरूवात आठ डिसेंबरपासून होणार आहे. 8 डिसेंबर म्हणजे गुरूवारी- 188 नगरपरिषदांसाठी मतदान होईल. 15 डिसेंबर,गुरुवारी रोजी 131 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2011 08:57 AM IST

आता सुट्टीच्या दिवशी मतदान बंद

20 नोव्हेंबर

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगानंही आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंयतींसाठी मतदान रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी न ठेवताकामकाजाच्या दिवशी ठेवलं जाणार आहे. सोयीनुसार मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याचा निर्णय याआधी निवडणूक आयोगाने घेतला होता. पण मतदानाची टक्केवारी वाढण्याऐवजी कमी झाल्याने आता कामकाजाच्या दिवशी मतदान ठेवलं जाणार आहे. त्याची सुरूवात आठ डिसेंबरपासून होणार आहे. 8 डिसेंबर म्हणजे गुरूवारी- 188 नगरपरिषदांसाठी मतदान होईल. 15 डिसेंबर,गुरुवारी रोजी 131 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2011 08:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close