S M L

स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यात भाजप अडकण्याची शक्यता

19 नोव्हेंबर2 जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यात आता भाजपही अडकण्याची शक्यता आहे. भाजप नेते आणि माजी दूरसंचार मंत्री दिवंगत प्रमोद महाजन यांच्या काळात झालेल्या स्पेक्ट्रम वाटपाबाबत आज सीबीआयने एफआयआर दाखल केली. महाजन यांच्या अतिरिक्त स्पेक्ट्रम वाटपाच्या निर्णयामुळे सरकारला 565 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा सीबीआयचा अंदाज आहे. याप्रकरणी एअरटेल आणि व्होडाफोन या मोबाईल कंपन्यांवरसुद्धा संशय आहे. व्होडाफोनच्या मुंबई आणि दिल्लीतल्या कार्यालयांवर आणि एअरटेलच्या गुडगावमधल्या ऑफिसवर सीबीआयने आज छापे टाकले. तसेच माजी टेलीकॉम सेक्रेटरी श्यामल घोष आणि माजी बीएसएनएल डिरेक्टर जे. आर. गुप्ता यांच्या घरीसुद्धा छापे टाकण्यात आले. 2 जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यातल्या प्राथमिक तपासात दुसरी एफआयआर दाखल झाली. यापूर्वी दयानिधी मारन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2011 05:23 PM IST

स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यात भाजप अडकण्याची शक्यता

19 नोव्हेंबर

2 जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यात आता भाजपही अडकण्याची शक्यता आहे. भाजप नेते आणि माजी दूरसंचार मंत्री दिवंगत प्रमोद महाजन यांच्या काळात झालेल्या स्पेक्ट्रम वाटपाबाबत आज सीबीआयने एफआयआर दाखल केली. महाजन यांच्या अतिरिक्त स्पेक्ट्रम वाटपाच्या निर्णयामुळे सरकारला 565 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा सीबीआयचा अंदाज आहे. याप्रकरणी एअरटेल आणि व्होडाफोन या मोबाईल कंपन्यांवरसुद्धा संशय आहे. व्होडाफोनच्या मुंबई आणि दिल्लीतल्या कार्यालयांवर आणि एअरटेलच्या गुडगावमधल्या ऑफिसवर सीबीआयने आज छापे टाकले. तसेच माजी टेलीकॉम सेक्रेटरी श्यामल घोष आणि माजी बीएसएनएल डिरेक्टर जे. आर. गुप्ता यांच्या घरीसुद्धा छापे टाकण्यात आले. 2 जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यातल्या प्राथमिक तपासात दुसरी एफआयआर दाखल झाली. यापूर्वी दयानिधी मारन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2011 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close