S M L

अजितदादांचे बापजादे क्रिकेट खेळायचे का ? : राज

20 नोव्हेंबरआमच्या बापजाद्यानी नांगर फिरवलं का असं विचारणार्‍या अजित पवारांच्या बापजादे काय क्रिकेट खेळायचे काय ? त्यांच्या बापजाद्यांनी काय रणजी ट्राफी खेळली आहे का अशी तिखट टीका राज ठाकरे यांनी पवारांवर केली. आज पुण्यात मनसे परीवहन सेनेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनाचे उद्धघाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. तसेच एसटी महामंडळाचे खासगीकरण होऊ देणार नाही असा इशाराही राज यांनी दिला. पुण्यात एसएसपीएमएस ग्राऊंडवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परीवहन सेनेच्या वतीने पहिले राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आले. या अधिवेशनाला मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. काल शनिवारीच राज ठाकरे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यामुळे आज राज काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र राज यांनी वस्तार्‍याला धार लावणं चालू आहे असं सांगत निवडणुकांची फटकेबाजी ही उमेदवारांची परीक्षा घेतल्यावरच सुरु होईल असं स्पष्ट केलं. राज यांनी उच्छुक उमेदवारांची परीक्षा घेण्याची काल घोषणा केली. राज्यात पोलीस भरतीच्या वेळी तरुणांची परीक्षा घेतली जाते वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या जातात मग गृहमंत्री आर.आर.पाटील यांची परीक्षा का घेतली नाही, त्यांची उंची मोजली नाही असा टोला राज यांनी आबांना लगावला. राज्यातील एसटी सेवा ही कौतुकास्पद आहे भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काही महिन्यांनी सर्वात पहिली परीवहन सेवा एसटीची होती. आणि पहिली एसटी धावली ती पुणे ते नगर या मार्गावर आणि आज पर्यंत सुरू आहे. त्यामुळे एसटीला आणि कामगारांना राज यांनी दंडवत घातला. त्याचबरोबर पोलिसांची बाजू घेत राज यांनी पोलिसांवर टीका करणे सोप आहे पण इतक्या कमी पगारात ऑन ड्युटी 24 तास राहणे सोपे नाही सरकारने त्यांची दखल घ्यावी अशी विनंतीही राज यांनी केली. राज्यात असलेल्या दूध कंपन्याचे दूध बंद करून परराज्यातील दूध राज्यात विकण्याचा हा राजकारण्याचा डाव आहे असा आरोपही राज यांनी केला. अजित पवार यांनी उध्दव आणि राज ठाकरे यांच्या पिढीतील कोणी शेतात नांगर तरी फिरवले असेल तर त्यांना शेतीतले कळेल असं विधान केलं होतं. अजितदादांच्या विधानाचा समाचार घेत राज यांनी प्रतिउत्तरदिलं. आम्ही जर शेती करण्याचे ठरवले तर सोन्याच्या नांगरांने शेती करु पण पवारांच्या बापजादे काय क्रिकेट खेळत होते का ? डब्लुटी बरोबर ते क्रिकेट खेळत होते का ?, का रणजी ट्राफी खेळले आहे, पवारांना बारामतीहून मुंबई पुण्यातील जमिनीचे स्केवेअर फुटांचे भाव कळत असतील तर आम्हालाही शेतातले कळेच असा टोला राज यांनी लगावला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2011 05:36 PM IST

अजितदादांचे बापजादे क्रिकेट खेळायचे का ? : राज

20 नोव्हेंबर

आमच्या बापजाद्यानी नांगर फिरवलं का असं विचारणार्‍या अजित पवारांच्या बापजादे काय क्रिकेट खेळायचे काय ? त्यांच्या बापजाद्यांनी काय रणजी ट्राफी खेळली आहे का अशी तिखट टीका राज ठाकरे यांनी पवारांवर केली. आज पुण्यात मनसे परीवहन सेनेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनाचे उद्धघाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. तसेच एसटी महामंडळाचे खासगीकरण होऊ देणार नाही असा इशाराही राज यांनी दिला.

पुण्यात एसएसपीएमएस ग्राऊंडवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परीवहन सेनेच्या वतीने पहिले राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आले. या अधिवेशनाला मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. काल शनिवारीच राज ठाकरे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यामुळे आज राज काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र राज यांनी वस्तार्‍याला धार लावणं चालू आहे असं सांगत निवडणुकांची फटकेबाजी ही उमेदवारांची परीक्षा घेतल्यावरच सुरु होईल असं स्पष्ट केलं.

राज यांनी उच्छुक उमेदवारांची परीक्षा घेण्याची काल घोषणा केली. राज्यात पोलीस भरतीच्या वेळी तरुणांची परीक्षा घेतली जाते वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या जातात मग गृहमंत्री आर.आर.पाटील यांची परीक्षा का घेतली नाही, त्यांची उंची मोजली नाही असा टोला राज यांनी आबांना लगावला. राज्यातील एसटी सेवा ही कौतुकास्पद आहे भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काही महिन्यांनी सर्वात पहिली परीवहन सेवा एसटीची होती. आणि पहिली एसटी धावली ती पुणे ते नगर या मार्गावर आणि आज पर्यंत सुरू आहे.

त्यामुळे एसटीला आणि कामगारांना राज यांनी दंडवत घातला. त्याचबरोबर पोलिसांची बाजू घेत राज यांनी पोलिसांवर टीका करणे सोप आहे पण इतक्या कमी पगारात ऑन ड्युटी 24 तास राहणे सोपे नाही सरकारने त्यांची दखल घ्यावी अशी विनंतीही राज यांनी केली. राज्यात असलेल्या दूध कंपन्याचे दूध बंद करून परराज्यातील दूध राज्यात विकण्याचा हा राजकारण्याचा डाव आहे असा आरोपही राज यांनी केला. अजित पवार यांनी उध्दव आणि राज ठाकरे यांच्या पिढीतील कोणी शेतात नांगर तरी फिरवले असेल तर त्यांना शेतीतले कळेल असं विधान केलं होतं.

अजितदादांच्या विधानाचा समाचार घेत राज यांनी प्रतिउत्तरदिलं. आम्ही जर शेती करण्याचे ठरवले तर सोन्याच्या नांगरांने शेती करु पण पवारांच्या बापजादे काय क्रिकेट खेळत होते का ? डब्लुटी बरोबर ते क्रिकेट खेळत होते का ?, का रणजी ट्राफी खेळले आहे, पवारांना बारामतीहून मुंबई पुण्यातील जमिनीचे स्केवेअर फुटांचे भाव कळत असतील तर आम्हालाही शेतातले कळेच असा टोला राज यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2011 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close