S M L

मैदान वाचवण्यासाठी बच्चेकंपनीची गांधीगिरी

21 नोव्हेंबरनाशिक महापालिकेच्या घरकूल योजनेला आता शाळेतल्या मुलांनी गांधीगिरी पद्धतीने विरोध केला. या बच्चेकंपनीने पदाधिकार्‍यांना गुलाबाची फुलं देऊन आपला निषेध व्यक्त केला. महापालिकेने बांधलेल्या घरकुल योजनेतली घरं रिकामी ओस पडली आहेत तर दुसरीकडे गंगापूरमधल्या या शाळेच्या मैदानावर घरकुलासाठी पाया खोदला जातोय. या ठिकाणी सोमेश्वर झोपडपट्टीतल्या कुटुंबांसाठी जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत ही घरकुल योजना राबवण्यात येणार आहे. पण याठिकाणी घरं बांधण्यास इथल्या नागरिकांचा विरोध आहे आणि झोपडपट्टीवासीयांचाही विरोध आता. आता तर शाळेचे विद्यार्थीच या लढ्यात उतरलेत कारण या बांधकामात त्यांच्या खेळायच्या मैदानाचा बळी जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 21, 2011 10:11 AM IST

मैदान वाचवण्यासाठी बच्चेकंपनीची गांधीगिरी

21 नोव्हेंबर

नाशिक महापालिकेच्या घरकूल योजनेला आता शाळेतल्या मुलांनी गांधीगिरी पद्धतीने विरोध केला. या बच्चेकंपनीने पदाधिकार्‍यांना गुलाबाची फुलं देऊन आपला निषेध व्यक्त केला. महापालिकेने बांधलेल्या घरकुल योजनेतली घरं रिकामी ओस पडली आहेत तर दुसरीकडे गंगापूरमधल्या या शाळेच्या मैदानावर घरकुलासाठी पाया खोदला जातोय. या ठिकाणी सोमेश्वर झोपडपट्टीतल्या कुटुंबांसाठी जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत ही घरकुल योजना राबवण्यात येणार आहे. पण याठिकाणी घरं बांधण्यास इथल्या नागरिकांचा विरोध आहे आणि झोपडपट्टीवासीयांचाही विरोध आता. आता तर शाळेचे विद्यार्थीच या लढ्यात उतरलेत कारण या बांधकामात त्यांच्या खेळायच्या मैदानाचा बळी जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2011 10:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close