S M L

कापसामुळे पॉवरलिफ्टर दिपालीचं स्वप्न धूसर

श्रीरंग खरे, नागपूर21 नोव्हेंबरकापसाला वाढीव हमीभाव मिळेल अशी अपेक्षा बाळगून असलेले कापूस शेतकरी आता उध्वस्त होण्याच्या वाटेवर आहेत. सरकार या शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करतं आहे. सरकारच्या या भोंगळ कारभारामुळे अशाच एका गरीब शेतकर्‍याला आपल्या मुलीचं स्वप्न धूसर होण्याची भीती वाटतेय. पॉवरलिफ्टिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या दिपालीला केवळ पैशांअभावी आपल्या करिअवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर देशा-परदेशात मिळवलेल्या मेडल्सकडे हताशपणे पाहणारी दिपाली नारखेडे भारतातल्या नामवंत पॉवरलिफ्टर्सपैकी एक.. राष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टिंगमध्ये आतापर्यंत 6 गोल्ड मेडल जिंकणार्‍या दिपालीनं चीनमध्ये झालेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताला ब्राँझ मेडलची कमाई करुन दिली. यानंतर दिपालीचं ध्येय आहे ते जपान आणि लंडनमध्ये होणार्‍या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावण्याचं... पण या स्पर्धेत दिपाली सहभागी होऊ शकत नाही आणि याचं कारण आहे कापसाला योग्य भाव न मिळणं.. हो हे खरं आहे. दिपालीचे वडील प्रल्हाद नारखेडे कापूस उत्पादक शेतकरी आहेत आणि आपल्या एक एकर जमिनीत त्यांनी कापसाची लागवड केली. कापसाला योग्य भाव मिळाला तर आपल्या मुलीला थोडीफार आर्थिक मदत मिळेल अशी अपेक्षा ते बाळगून आहेत. त्यांच्या डोक्यावर आधीच 6 लाख रुपयांचं कर्ज आहे. आणि मुलीला परदेशात स्पर्धेला पाठवण्यासाठी त्यांनी आणखी कर्ज काढलं आहे. पण तेही अपूरं पडतंय. या स्पर्धेसाठी दिपालीला 3 लाखांहून अधिक रुपयांची गरज आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येत्या 25 नोव्हेंबरपर्यंत दिपालीला पैसे जमा करायचे आहे. पण सध्यातरी दिपालीच्या वडिलांना हे शक्य नाही. आपल्या डोळ्यासमोर मुलीचे स्वप्न भंग होताना पाहण्यापलिकडे ते काहीच करु शकत नाही.तळागाळातील खेळाडूंना आर्थिक मदतीचे आश्वासन देणार्‍या राजकीय पक्षांकडेही दिपालीच्या वडिलांनी प्रयत्न केले. पण यात त्यांना फारसं यश आलेलं नाही. महाराष्ट्र आणि देशाचे नावं उंचावणार्‍या दिपालीकडे अद्याप ना सरकारने लक्ष दिलंय ना कोणत्या मंत्र्यानं. क्रिकेटवर आपल्या देशात कोट्यवधी रुपयांची उधळण केली जाते. पण इतर खेळात मदत मिळवण्यासाठी खेळाडूंना हात पसरवा लागतो. ही खेळाची शोकांतिकाच म्हणावी लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 21, 2011 12:38 PM IST

कापसामुळे पॉवरलिफ्टर दिपालीचं स्वप्न धूसर

श्रीरंग खरे, नागपूर

21 नोव्हेंबर

कापसाला वाढीव हमीभाव मिळेल अशी अपेक्षा बाळगून असलेले कापूस शेतकरी आता उध्वस्त होण्याच्या वाटेवर आहेत. सरकार या शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करतं आहे. सरकारच्या या भोंगळ कारभारामुळे अशाच एका गरीब शेतकर्‍याला आपल्या मुलीचं स्वप्न धूसर होण्याची भीती वाटतेय. पॉवरलिफ्टिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या दिपालीला केवळ पैशांअभावी आपल्या करिअवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे.

जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर देशा-परदेशात मिळवलेल्या मेडल्सकडे हताशपणे पाहणारी दिपाली नारखेडे भारतातल्या नामवंत पॉवरलिफ्टर्सपैकी एक.. राष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टिंगमध्ये आतापर्यंत 6 गोल्ड मेडल जिंकणार्‍या दिपालीनं चीनमध्ये झालेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताला ब्राँझ मेडलची कमाई करुन दिली. यानंतर दिपालीचं ध्येय आहे ते जपान आणि लंडनमध्ये होणार्‍या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावण्याचं... पण या स्पर्धेत दिपाली सहभागी होऊ शकत नाही आणि याचं कारण आहे कापसाला योग्य भाव न मिळणं.. हो हे खरं आहे.

दिपालीचे वडील प्रल्हाद नारखेडे कापूस उत्पादक शेतकरी आहेत आणि आपल्या एक एकर जमिनीत त्यांनी कापसाची लागवड केली. कापसाला योग्य भाव मिळाला तर आपल्या मुलीला थोडीफार आर्थिक मदत मिळेल अशी अपेक्षा ते बाळगून आहेत. त्यांच्या डोक्यावर आधीच 6 लाख रुपयांचं कर्ज आहे. आणि मुलीला परदेशात स्पर्धेला पाठवण्यासाठी त्यांनी आणखी कर्ज काढलं आहे. पण तेही अपूरं पडतंय. या स्पर्धेसाठी दिपालीला 3 लाखांहून अधिक रुपयांची गरज आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येत्या 25 नोव्हेंबरपर्यंत दिपालीला पैसे जमा करायचे आहे. पण सध्यातरी दिपालीच्या वडिलांना हे शक्य नाही. आपल्या डोळ्यासमोर मुलीचे स्वप्न भंग होताना पाहण्यापलिकडे ते काहीच करु शकत नाही.

तळागाळातील खेळाडूंना आर्थिक मदतीचे आश्वासन देणार्‍या राजकीय पक्षांकडेही दिपालीच्या वडिलांनी प्रयत्न केले. पण यात त्यांना फारसं यश आलेलं नाही. महाराष्ट्र आणि देशाचे नावं उंचावणार्‍या दिपालीकडे अद्याप ना सरकारने लक्ष दिलंय ना कोणत्या मंत्र्यानं. क्रिकेटवर आपल्या देशात कोट्यवधी रुपयांची उधळण केली जाते. पण इतर खेळात मदत मिळवण्यासाठी खेळाडूंना हात पसरवा लागतो. ही खेळाची शोकांतिकाच म्हणावी लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2011 12:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close