S M L

नाशिकमध्ये तरूणीला जिवंत जाळले

22 नोव्हेंबरनाशिकपासून 150 किलोमिटर अंतरावर असणार्‍या कळवण तालुक्यात दुपारी तीनच्या सुमारास एका 24 वर्षीय तरुणीला जिंवत जाळण्याची घटना घडली आहे. रंजना पवार असे या तरुणीचे नाव आहे. शेजार्‍यांशी झालेल्या किरकोळ कारणावरुन ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतले आहे. रंजना पवार ही पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. काही दिवसांपूर्वीच आपल्या वृध्द आई - वडिलांसोबत ती कळवण येथे राहण्यासाठी आली होती. आज दुपारी तीनच्या सुमारास तिचे शेजार्‍यांशी किरकोळ कारणावरुन भांडण झाले. यानंतर संतप्त शेजार्‍यांनी रंजनाला घरात घुसून बेदम मारहाण केली आणि रॉकेल टाकून पेटवून दिले. यात रंजना 60 टक्के भाजली. रंजनाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2011 01:44 PM IST

नाशिकमध्ये तरूणीला जिवंत जाळले

22 नोव्हेंबर

नाशिकपासून 150 किलोमिटर अंतरावर असणार्‍या कळवण तालुक्यात दुपारी तीनच्या सुमारास एका 24 वर्षीय तरुणीला जिंवत जाळण्याची घटना घडली आहे. रंजना पवार असे या तरुणीचे नाव आहे. शेजार्‍यांशी झालेल्या किरकोळ कारणावरुन ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतले आहे. रंजना पवार ही पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. काही दिवसांपूर्वीच आपल्या वृध्द आई - वडिलांसोबत ती कळवण येथे राहण्यासाठी आली होती. आज दुपारी तीनच्या सुमारास तिचे शेजार्‍यांशी किरकोळ कारणावरुन भांडण झाले. यानंतर संतप्त शेजार्‍यांनी रंजनाला घरात घुसून बेदम मारहाण केली आणि रॉकेल टाकून पेटवून दिले. यात रंजना 60 टक्के भाजली. रंजनाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2011 01:44 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close