S M L

विंडीजची 575 धावांवर मजल

23 नोव्हेंबरमुंबई टेस्टच्या दुसर्‍या दिवशी वेस्ट इंडीजची टीम भक्कम अवस्थेत पोहोचली आहे. डेरेन ब्राव्होची सेंच्युरी आणि पहिल्या पाचही बॅट्समननी केलेल्या हाफ सेंच्युरी. यांच्या जोरावर विंडीजने आतापर्यंत 9 विकेटवर 575 रन्सची मजल मारली आहे. दुसर्‍या दिवसाचा हीरो ठरला तो डॅरन ब्राव्हो. कालच्या दोन विकेटवर 269 रनच्या स्कोअरवर विंडीजने आपली इनिंग आज पुढे सुरु केली. एडवर्ड्स आणि ब्राव्होने सेंच्युरी पार्टनरशिप करत भारतीय बॉलर्सचं घामटं काढलं. अखेर पहिलं यश ईशांत शर्माला मिलालं. त्याच्या बॉलवर कर्क एडवर्ड्सने धोणीकडे कॅच दिला. त्याला सेंच्युरीसाठी फक्त चौदा रन कमी पडले. पण भारतीय बॉलर्सच्या चेहर्‍यावरचा आनंद फार काळ टिकला नाही. ब्राव्होच्या साथीने पॉवेल आला. आणि दोघांना खासकरुन स्पिनर्सची धुलाई केली. ब्राव्होने या सीरिजमधली आपली सलग दुसरी सेंच्युरीही मग पूर्ण केली. एडवर्ड्स आणि नंतर पॉवेल बरोबर त्याने मोठ्या पार्टनरशिप केल्या. मर्वन सॅम्युअल्सनेही हाफ सेंच्युरी करत विंडीज स्कोअर साडे पाचशेच्या पलिकडे नेला. भारतातर्फे वरुण ऐरॉन तीन विकेट घेत सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला. आणि दुसरा दिवस संपेपर्यंत विंडीज टीमने नऊ विकेटवर 575 रन केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2011 11:05 AM IST

विंडीजची 575 धावांवर मजल

23 नोव्हेंबर

मुंबई टेस्टच्या दुसर्‍या दिवशी वेस्ट इंडीजची टीम भक्कम अवस्थेत पोहोचली आहे. डेरेन ब्राव्होची सेंच्युरी आणि पहिल्या पाचही बॅट्समननी केलेल्या हाफ सेंच्युरी. यांच्या जोरावर विंडीजने आतापर्यंत 9 विकेटवर 575 रन्सची मजल मारली आहे. दुसर्‍या दिवसाचा हीरो ठरला तो डॅरन ब्राव्हो. कालच्या दोन विकेटवर 269 रनच्या स्कोअरवर विंडीजने आपली इनिंग आज पुढे सुरु केली. एडवर्ड्स आणि ब्राव्होने सेंच्युरी पार्टनरशिप करत भारतीय बॉलर्सचं घामटं काढलं. अखेर पहिलं यश ईशांत शर्माला मिलालं. त्याच्या बॉलवर कर्क एडवर्ड्सने धोणीकडे कॅच दिला. त्याला सेंच्युरीसाठी फक्त चौदा रन कमी पडले. पण भारतीय बॉलर्सच्या चेहर्‍यावरचा आनंद फार काळ टिकला नाही. ब्राव्होच्या साथीने पॉवेल आला. आणि दोघांना खासकरुन स्पिनर्सची धुलाई केली. ब्राव्होने या सीरिजमधली आपली सलग दुसरी सेंच्युरीही मग पूर्ण केली. एडवर्ड्स आणि नंतर पॉवेल बरोबर त्याने मोठ्या पार्टनरशिप केल्या. मर्वन सॅम्युअल्सनेही हाफ सेंच्युरी करत विंडीज स्कोअर साडे पाचशेच्या पलिकडे नेला. भारतातर्फे वरुण ऐरॉन तीन विकेट घेत सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला. आणि दुसरा दिवस संपेपर्यंत विंडीज टीमने नऊ विकेटवर 575 रन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2011 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close