S M L

इशरतवरचा अतिरेकी कलंक मिटवण्यासाठी केस लढवली !

22 नोव्हेंबरइशरत जहाँवरचा अतिरेकी असल्याचा कलंक मिटवण्यासाठी केस लढवली असं तिच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह इशरतच्या कुटुंबीयांनी आज पत्रकार परिषद घेतली. इशरतची आई, भाऊ आणि काका यावेळी उपस्थित होते. या बनावट एन्काऊंटर प्रकरणात ज्यांचा हात आहे त्यांनाही शिक्षा व्हायला हवी अशी मागणीही इशरतच्या कुटुंबीयांनी केली. इशरतला नाशिकहून उचलून नेऊन तिची हत्या करण्यात आली, असं सांगत तिच्या काकांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. या प्रकरणात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचाच हात असल्याचा थेट आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच इशरत जहाँचं बनावट असलं असा अहवाल SIT नं सादर केला असला तरी, SIT नं इशरतला मात्र क्लीन चिट दिली नाही, असं माजी केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्लई यांनी म्हटलं आहे. त्यावर पिल्लई यांच्यासारख्या व्यक्तीने असं मत व्यक्त करणं दुर्देवी आहे अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2011 11:12 AM IST

इशरतवरचा अतिरेकी कलंक मिटवण्यासाठी केस लढवली !

22 नोव्हेंबर

इशरत जहाँवरचा अतिरेकी असल्याचा कलंक मिटवण्यासाठी केस लढवली असं तिच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह इशरतच्या कुटुंबीयांनी आज पत्रकार परिषद घेतली. इशरतची आई, भाऊ आणि काका यावेळी उपस्थित होते. या बनावट एन्काऊंटर प्रकरणात ज्यांचा हात आहे त्यांनाही शिक्षा व्हायला हवी अशी मागणीही इशरतच्या कुटुंबीयांनी केली. इशरतला नाशिकहून उचलून नेऊन तिची हत्या करण्यात आली, असं सांगत तिच्या काकांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. या प्रकरणात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचाच हात असल्याचा थेट आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच इशरत जहाँचं बनावट असलं असा अहवाल SIT नं सादर केला असला तरी, SIT नं इशरतला मात्र क्लीन चिट दिली नाही, असं माजी केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्लई यांनी म्हटलं आहे. त्यावर पिल्लई यांच्यासारख्या व्यक्तीने असं मत व्यक्त करणं दुर्देवी आहे अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2011 11:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close