S M L

हिवाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात ; कामकाज ठप्प

22 नोव्हेंबरसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात वादळी झाली. महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजप आणि डावे सरकारविरोधात एकत्र आले. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब झालं. 2 जी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी राजीनामा देण्याची मागणी करत त्यांना घेरण्याची जय्यत तयारी विरोधकांनी केली. तर रुपयाची घसरत असलेली किंमत पाहता आर्थिक कोंडी फोडण्यासाठी विरोधकांनी सरकारला सहकार्य करावे असं आवाहन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या चेहर्‍यावरचं हे स्मितहास्य टीकून राहू नये, यासाठी विरोधकांनी रणनीती आखली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस कोणत्याही कामकाजाशिवाय गदारोळात संपला. महागाईच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी डाव्यांनी लावून धरली. तर भाजपने चिदंबरम यांच्यावर बहिष्कार टाकला. त्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. अंतर्गत मतभेदांशी झगडणार्‍या सरकारनं आपल्या गृहमंत्र्यांचा बचाव करण्यासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न केला.देशाचे आर्थिक चित्र खराब दिसत असताना संसदेत हा हंगामा सुरू होता. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या गटांगळ्या सुुरूच आहेत. मंगळवारी रुपयाची किंमत प्रति डॉलर 57 रुपये 72 पैशांपर्यंत घसरली. याच बिकट आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत पंतप्रधानांनी विरोधकांना संयमानं वागण्याचं आवाहन केलं आहे. चिदंबरम यांच्यावर बहिष्काराचा निर्णय बदलतील, अशी आशा पंतप्रधानांना आहे. लोकपालासारखे अनेक महत्त्वाचे विषय या अधिवेशनात आहेत. ते मंजूर होणं गरजेचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पण भाजपने मात्र सरकारला कोंडीत पकडण्याची जय्यत तयारी केली आहे. शिवाय लोकपाल विधेयकावरून टीम अण्णाही झालीय. त्यामुळे या अधिवेशनात सरकारची परीक्षाच आहे.दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातल्या महागाईमुळे देशातल्या जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढणारच, असं केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. त्यावर भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी तीव्र टीका केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2011 05:20 PM IST

हिवाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात ; कामकाज ठप्प

22 नोव्हेंबर

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात वादळी झाली. महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजप आणि डावे सरकारविरोधात एकत्र आले. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब झालं. 2 जी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी राजीनामा देण्याची मागणी करत त्यांना घेरण्याची जय्यत तयारी विरोधकांनी केली. तर रुपयाची घसरत असलेली किंमत पाहता आर्थिक कोंडी फोडण्यासाठी विरोधकांनी सरकारला सहकार्य करावे असं आवाहन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या चेहर्‍यावरचं हे स्मितहास्य टीकून राहू नये, यासाठी विरोधकांनी रणनीती आखली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस कोणत्याही कामकाजाशिवाय गदारोळात संपला. महागाईच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी डाव्यांनी लावून धरली. तर भाजपने चिदंबरम यांच्यावर बहिष्कार टाकला. त्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. अंतर्गत मतभेदांशी झगडणार्‍या सरकारनं आपल्या गृहमंत्र्यांचा बचाव करण्यासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न केला.

देशाचे आर्थिक चित्र खराब दिसत असताना संसदेत हा हंगामा सुरू होता. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या गटांगळ्या सुुरूच आहेत. मंगळवारी रुपयाची किंमत प्रति डॉलर 57 रुपये 72 पैशांपर्यंत घसरली. याच बिकट आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत पंतप्रधानांनी विरोधकांना संयमानं वागण्याचं आवाहन केलं आहे. चिदंबरम यांच्यावर बहिष्काराचा निर्णय बदलतील, अशी आशा पंतप्रधानांना आहे. लोकपालासारखे अनेक महत्त्वाचे विषय या अधिवेशनात आहेत. ते मंजूर होणं गरजेचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पण भाजपने मात्र सरकारला कोंडीत पकडण्याची जय्यत तयारी केली आहे. शिवाय लोकपाल विधेयकावरून टीम अण्णाही झालीय. त्यामुळे या अधिवेशनात सरकारची परीक्षाच आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातल्या महागाईमुळे देशातल्या जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढणारच, असं केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. त्यावर भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी तीव्र टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2011 05:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close