S M L

कापसावर तोडगा नाहीच !

23 नोव्हेंबरकापूसप्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलावलेल्या आजच्या सर्वपक्षीय बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. आजच्या बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांबरोबरच काही संघटनांच्या नेत्यांनाही चर्चेसाठी बोलावलं होतं. विदर्भातील नेतेही या बैठकीला उपस्थित होते. पण या चर्चेतून काहीही निष्कर्ष निघू शकला नाही. आजच्या बैठकीत सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि सगळ्या पक्षांच्या नेत्यांची मत जाणून घेतली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. आता ते या सगळ्याचं म्हणणं केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणार आहेत. पण ठोस निर्णयासाठी कापूस उत्पादककांना अजूनही वाटचं पहावी लागणार आहे. तर या प्रश्नावर तोडगा काढण्याची सरकारची तयारीचं नसल्याचा आरोप या बैठकीत सहभागी झालेल्या विरोधकांनी केला. संसदेत धरणे आंदोलन तर दिल्लीत संसद परिसरात आजही कापूस प्रश्नावरुन आंदोलन झालं. सेना भाजप खासदारांनी संसद परिसरात धरणे आंदोलन केलं.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टीही या आंदोलनात सहभागी झाले होते. कापसाला 6000 रूपये हमीभाव द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन केलं. काल पहिल्याच दिवशी शिवसेना आणि भाजपच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शन केली होती.शिवसैनिकांनी टायर जाळले विदर्भात नागपूर जिल्ह्यात कापूस आणि धान प्रश्नावर शिवसेनेच आंदोलन पेटत चाललं आहे. माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कुही - माढळ रस्ता 2 तास रोखून धरला. आंदोलकांनी रस्त्यावर ठिकठिकाणी टायर पेटवून दिले. याचबरोबर शिवसैनिकांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना घेराव घातला. लोडशेडिंगचा कालावधी वाढल्यास महावितरणचं कार्यालय जाळून टाकण्याच्या इशारा प्रकाश जाधव यांनी दिला. महिला शेतकर्‍यांनी केला रास्ता रोकोतर जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथं आंदोलनात आज महिला शेतकरी उतरल्या. या महिलांनी रोडवर ठिय्या देत महामार्ग जवळपास 1 तास रोखून धरला होता. कापसाला वाढीव हमीभाव देण्याची मागणी या महिलांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 30 महिलांना ताब्यात घेतलं आणि काही वेळानंतर सोडून दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2011 09:03 AM IST

कापसावर तोडगा नाहीच !

23 नोव्हेंबर

कापूसप्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलावलेल्या आजच्या सर्वपक्षीय बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. आजच्या बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांबरोबरच काही संघटनांच्या नेत्यांनाही चर्चेसाठी बोलावलं होतं. विदर्भातील नेतेही या बैठकीला उपस्थित होते. पण या चर्चेतून काहीही निष्कर्ष निघू शकला नाही. आजच्या बैठकीत सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि सगळ्या पक्षांच्या नेत्यांची मत जाणून घेतली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. आता ते या सगळ्याचं म्हणणं केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणार आहेत. पण ठोस निर्णयासाठी कापूस उत्पादककांना अजूनही वाटचं पहावी लागणार आहे. तर या प्रश्नावर तोडगा काढण्याची सरकारची तयारीचं नसल्याचा आरोप या बैठकीत सहभागी झालेल्या विरोधकांनी केला. संसदेत धरणे आंदोलन

तर दिल्लीत संसद परिसरात आजही कापूस प्रश्नावरुन आंदोलन झालं. सेना भाजप खासदारांनी संसद परिसरात धरणे आंदोलन केलं.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टीही या आंदोलनात सहभागी झाले होते. कापसाला 6000 रूपये हमीभाव द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन केलं. काल पहिल्याच दिवशी शिवसेना आणि भाजपच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शन केली होती.

शिवसैनिकांनी टायर जाळले

विदर्भात नागपूर जिल्ह्यात कापूस आणि धान प्रश्नावर शिवसेनेच आंदोलन पेटत चाललं आहे. माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कुही - माढळ रस्ता 2 तास रोखून धरला. आंदोलकांनी रस्त्यावर ठिकठिकाणी टायर पेटवून दिले. याचबरोबर शिवसैनिकांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना घेराव घातला. लोडशेडिंगचा कालावधी वाढल्यास महावितरणचं कार्यालय जाळून टाकण्याच्या इशारा प्रकाश जाधव यांनी दिला.

महिला शेतकर्‍यांनी केला रास्ता रोको

तर जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथं आंदोलनात आज महिला शेतकरी उतरल्या. या महिलांनी रोडवर ठिय्या देत महामार्ग जवळपास 1 तास रोखून धरला होता. कापसाला वाढीव हमीभाव देण्याची मागणी या महिलांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 30 महिलांना ताब्यात घेतलं आणि काही वेळानंतर सोडून दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2011 09:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close