S M L

सिंधुदुर्गात जंगली हत्तींचे धुमशान

23 नोव्हेंबरसिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा जंगली हत्तींचं धुमशान सुरू झालं आहे. कुडाळ तालुक्यातल्या हिर्लोक गावात हत्तींनी शेतकर्‍यांच्या माड आणि केळीच्या बागा मोडून उद्‌ध्वस्त केल्या. पूर्ण वाढलेले माड हत्तींनी भुईसपाट केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. बांबूची बेटं, भातपीक आणि घरांचही मोठं नुकसान हत्तींनी केलं आहे. काही शेतकरीही हत्तींच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनच हत्ती असल्याचे वनविभागाकडून वारंवार सांगितलं जात असलं, तरी पुन्हा एकदा नव्याने काही हत्ती आल्याचे शेतकर्‍यांकडून सांगितले जात आहे. दुसरीकडे माडांसाठी सरकारकडून मिळणारी फक्त 2 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळण्यासाठीही शेतकर्‍यांना तीन तीन वर्षं थांबावे लागतं असल्याने शेतकरी संतापले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2011 09:33 AM IST

सिंधुदुर्गात जंगली हत्तींचे धुमशान

23 नोव्हेंबर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा जंगली हत्तींचं धुमशान सुरू झालं आहे. कुडाळ तालुक्यातल्या हिर्लोक गावात हत्तींनी शेतकर्‍यांच्या माड आणि केळीच्या बागा मोडून उद्‌ध्वस्त केल्या. पूर्ण वाढलेले माड हत्तींनी भुईसपाट केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. बांबूची बेटं, भातपीक आणि घरांचही मोठं नुकसान हत्तींनी केलं आहे. काही शेतकरीही हत्तींच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनच हत्ती असल्याचे वनविभागाकडून वारंवार सांगितलं जात असलं, तरी पुन्हा एकदा नव्याने काही हत्ती आल्याचे शेतकर्‍यांकडून सांगितले जात आहे. दुसरीकडे माडांसाठी सरकारकडून मिळणारी फक्त 2 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळण्यासाठीही शेतकर्‍यांना तीन तीन वर्षं थांबावे लागतं असल्याने शेतकरी संतापले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2011 09:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close