S M L

मनसेचा प्रचाराचा अजेंडा 'मिनी ब्ल्यू प्रिंट' वर !

23 नोव्हेंबरमंुबई महापालिकेसाठी मनसेने जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. इच्छुक उमेदवारांच्या परीक्षा असल्याने सगळेच कार्यकर्ते तयारीला लागले आहे. त्यातच राज ठाकरेंनी सुद्धा तयारी चालवली. ही तयारी आहे मनसेच्या प्रचाराची... उत्तम शहरं कशी असावीत याची एक मिनी ब्ल्यू प्रिंट मनसेच्या प्रचाराच्या अजेंड्यावर असणार आहे. कल्याण डोंबिवलीत राज ठाकरेंनी मतदारांना एकहाती सत्ता देण्याचं आवाहन केलं. पण सत्ता आल्यानंतर नेमकं काय करणार हे सांगायला ते विसरले आणि त्यावरच उपाय सध्या राज ठाकरे शोधत आहे. आणि महापालिका निवडणुकांसाठी राज मिनी ब्लू प्रिंटवर काम करत असल्याची चर्चा आहे. यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्यासारख्या नामांकीत आर्किटेक्ट आणि बांधकाम व्यावसायिकाबरोबर चर्चा केल्याची खात्रीलायक बातमी आहे. त्याचबरोबर गुजरात दौर्‍यादरम्यान भेटलेल्या काही तज्ज्ञांना मुंबईत बोलावून, त्यांच्यांशीही संवाद साधला.मोठ्या शहरांच्या समस्या आणि त्यावरचे उपाय याबाबत एक मिनी ब्लू प्रिंट प्रचारादरम्यान आणून विरोधकांना धक्का देत, मतदारांच्या मनातही पक्षाबद्दल विश्वास निर्माण करणे हा या रणनिती मागचा विचार असणार हे उघड आहे. आणि त्याचबरोबर सत्ताधार्‍यांचे अपयशही या माध्यमातून दाखवणं अधिक सोपं होणार... त्यामुळे सत्ताधार्‍यांचे अपयश आणि विकासाची योजना असं दुधारी अस्त्रं मनसेच्या प्रचारात वापरले जाईल.मराठी अस्मिता हा मनसेचा प्रमुख मुद्दा... पण महापालिका निवडणुकांत यश मिळवायचं असेलं तर फक्त हा मुद्दा पुरेसा नाही हे मनसेने ओळखलंय. आणि म्हणूनच ही मिनी ब्लू प्रिंट मनसेच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2011 04:33 PM IST

मनसेचा प्रचाराचा अजेंडा 'मिनी ब्ल्यू प्रिंट' वर !

23 नोव्हेंबर

मंुबई महापालिकेसाठी मनसेने जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. इच्छुक उमेदवारांच्या परीक्षा असल्याने सगळेच कार्यकर्ते तयारीला लागले आहे. त्यातच राज ठाकरेंनी सुद्धा तयारी चालवली. ही तयारी आहे मनसेच्या प्रचाराची... उत्तम शहरं कशी असावीत याची एक मिनी ब्ल्यू प्रिंट मनसेच्या प्रचाराच्या अजेंड्यावर असणार आहे.

कल्याण डोंबिवलीत राज ठाकरेंनी मतदारांना एकहाती सत्ता देण्याचं आवाहन केलं. पण सत्ता आल्यानंतर नेमकं काय करणार हे सांगायला ते विसरले आणि त्यावरच उपाय सध्या राज ठाकरे शोधत आहे. आणि महापालिका निवडणुकांसाठी राज मिनी ब्लू प्रिंटवर काम करत असल्याची चर्चा आहे. यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्यासारख्या नामांकीत आर्किटेक्ट आणि बांधकाम व्यावसायिकाबरोबर चर्चा केल्याची खात्रीलायक बातमी आहे. त्याचबरोबर गुजरात दौर्‍यादरम्यान भेटलेल्या काही तज्ज्ञांना मुंबईत बोलावून, त्यांच्यांशीही संवाद साधला.

मोठ्या शहरांच्या समस्या आणि त्यावरचे उपाय याबाबत एक मिनी ब्लू प्रिंट प्रचारादरम्यान आणून विरोधकांना धक्का देत, मतदारांच्या मनातही पक्षाबद्दल विश्वास निर्माण करणे हा या रणनिती मागचा विचार असणार हे उघड आहे. आणि त्याचबरोबर सत्ताधार्‍यांचे अपयशही या माध्यमातून दाखवणं अधिक सोपं होणार... त्यामुळे सत्ताधार्‍यांचे अपयश आणि विकासाची योजना असं दुधारी अस्त्रं मनसेच्या प्रचारात वापरले जाईल.

मराठी अस्मिता हा मनसेचा प्रमुख मुद्दा... पण महापालिका निवडणुकांत यश मिळवायचं असेलं तर फक्त हा मुद्दा पुरेसा नाही हे मनसेने ओळखलंय. आणि म्हणूनच ही मिनी ब्लू प्रिंट मनसेच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2011 04:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close