S M L

संसद ठप्प, खर्च सुरू !

23 नोव्हेंबरसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवसही वाया गेला. महागाईच्या मुद्द्यावर चर्चेसोबत मतदानही हवं, ही डाव्यांची मागणी सरकारने धुडकावून लावली. महागाई, काळा पैसा, तेलंगणा, कापूस, चिदंबरम अशा अनेक मुद्द्यांवरून आज दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. गेल्या दोन दिवसांत कामकाज न झाल्याने महत्त्वाचा वेळ आणि करदात्यांचे सुमारे 8 कोटी रुपये वाया गेले आहे. हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस.. आगदी पहिल्या दिवसाच्या मार्गानंच गेला. महागाईच्या मुद्द्यावर चर्चेसोबत मतदान घ्यावे या मागणीवर माकपचे खासदार ठाम होते. पण सीपीआयने मात्र जरा नरमाईची भूमिका घेतली. कारण यूपीएच्या नेत्यांनी त्यांना समजावलं की जर मतदान झालं, तर मध्यावधी निवडणुकांना सामोरं जावं लागू शकतं. दुसरीकडे, छोट्या पक्षांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न सरकार करतं आहे. प्रणव मुखजीर्ंनी मुलायम सिंग आणि शरद यादव यांची भेट घेतली. भाजप एकीकडे डाव्यांच्या महागाईच्या मुद्द्याला पाठिंबा देतंय, तर दुसरीकडे काळ्या पैशांवर स्थगन प्रस्ताव आणण्यासाठी आग्रह धरतं आहे. या अधिवेशनात आता केवळ 17 दिवस शिल्लक आहेत. पहिले दोन दिवस पूर्णपणे वाया गेलेत.. संसद ठप्प, खर्च सुरू!- संसदेच्या कामकाजावर करदात्यांचे तासाला 25 लाख रु. खर्च होतात- दररोज 8 तास कामकाज चाललं तर 2 कोटी रुपये खर्च- 2 जी प्रकरणावरून मागील हिवाळी अधिवेशन पूर्णपणे वाया - एकूण वेळेपैकी लोकसभेत फक्त 5.5% तर राज्यसभेत 2.4% कामकाज झालं होतं- पावसाळी अधिवेशनात अण्णांच्या उपोषणामुळे कामकाज बर्‍यापैकी झालं- लोकसभेत 67% तर राज्यसभेत 72% कामकाज झालंया अधिवेशनात प्रत्येक दिवशी दोन विधेयकं मंजूर करवून घेण्याचा सरकारचा इरादा होता. पण आता एक तरी कायदा बनू शकेल का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2011 05:36 PM IST

संसद ठप्प, खर्च सुरू !

23 नोव्हेंबर

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवसही वाया गेला. महागाईच्या मुद्द्यावर चर्चेसोबत मतदानही हवं, ही डाव्यांची मागणी सरकारने धुडकावून लावली. महागाई, काळा पैसा, तेलंगणा, कापूस, चिदंबरम अशा अनेक मुद्द्यांवरून आज दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. गेल्या दोन दिवसांत कामकाज न झाल्याने महत्त्वाचा वेळ आणि करदात्यांचे सुमारे 8 कोटी रुपये वाया गेले आहे.

हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस.. आगदी पहिल्या दिवसाच्या मार्गानंच गेला. महागाईच्या मुद्द्यावर चर्चेसोबत मतदान घ्यावे या मागणीवर माकपचे खासदार ठाम होते. पण सीपीआयने मात्र जरा नरमाईची भूमिका घेतली. कारण यूपीएच्या नेत्यांनी त्यांना समजावलं की जर मतदान झालं, तर मध्यावधी निवडणुकांना सामोरं जावं लागू शकतं.

दुसरीकडे, छोट्या पक्षांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न सरकार करतं आहे. प्रणव मुखजीर्ंनी मुलायम सिंग आणि शरद यादव यांची भेट घेतली. भाजप एकीकडे डाव्यांच्या महागाईच्या मुद्द्याला पाठिंबा देतंय, तर दुसरीकडे काळ्या पैशांवर स्थगन प्रस्ताव आणण्यासाठी आग्रह धरतं आहे. या अधिवेशनात आता केवळ 17 दिवस शिल्लक आहेत. पहिले दोन दिवस पूर्णपणे वाया गेलेत..

संसद ठप्प, खर्च सुरू!

- संसदेच्या कामकाजावर करदात्यांचे तासाला 25 लाख रु. खर्च होतात- दररोज 8 तास कामकाज चाललं तर 2 कोटी रुपये खर्च- 2 जी प्रकरणावरून मागील हिवाळी अधिवेशन पूर्णपणे वाया - एकूण वेळेपैकी लोकसभेत फक्त 5.5% तर राज्यसभेत 2.4% कामकाज झालं होतं- पावसाळी अधिवेशनात अण्णांच्या उपोषणामुळे कामकाज बर्‍यापैकी झालं- लोकसभेत 67% तर राज्यसभेत 72% कामकाज झालं

या अधिवेशनात प्रत्येक दिवशी दोन विधेयकं मंजूर करवून घेण्याचा सरकारचा इरादा होता. पण आता एक तरी कायदा बनू शकेल का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2011 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close