S M L

पुण्यात बीआरटी प्रकल्पाचा उडाला बोजवारा

23 नोव्हेंबरपीएमटी आणि पीएसीएससी पाठोपाठ बीआरटी ही आली आणि आता मेट्रोची स्वप्न पुणेकरांना दाखवली जात आहे. पण यातल्या एकाही गोष्टीची अंमलबजावणी नीटपणे होत नाही. चांगल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची मागणी करणार्‍या पुणेकरांना 'शांतता राजकारण सुरु आहे' हाच प्रयोग पुन्हा-पुन्हा पहायला मिळतोय.गेल्या निवडणुकीच्या आधी घाईघाईने BRT च्या पायलट प्रोजेक्टचं उद्घाटन झाले. यानंतर एका भागात का होईना चांगली वाहतुक व्यवस्था मिळेलं असं पुणेकरांना वाटलं. पण या प्रोजेक्टचा पाच वर्षांनंतर पूर्णपणे बोजवारा उडाला.अहमदाबादला जाऊन आल्यानंतर, खासदार सुप्रिया सुळेंना, BRT सुधारण्याची गरज वाटतेय. फक्त BRT नाही तर PMT च्याही पुरेशा बसेस रस्त्यावर धावत नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुरघोडीच्या राजकारणात मेट्रोचही भिजतं घोंगडं झालं आहे. सुप्रिया सुळेंनी बीआरटीसाठी तज्ञांची मतं मागवलीत.पुण्यातली वाहतुक स्थिती1. पुण्यातील लोकसंख्येनुसार सध्या पुण्यात 3 हजार बसेसची आवश्यकता आहे. सध्या मात्र रस्त्यावर फक्त 1,500 बस चालत आहेत. 2. दरवाजे कुठल्या बाजूला असावेत या वादात बसेसची खरेदी अनेक वर्षांपासून रखडली आहे. 4. राज्य सरकारकडून मेट्रोच्या प्रकल्पाला अजूनही मंजूरी नाही. जून 2010 मध्ये मेट्रोचा आराखडा सर्वसाधारण सभेने मंजूर करुन राज्य सरकारकडे पाठवला. निर्णय अजूनही प्रलंबित...5. आता पुन्हा मेट्रो भुयारी व्हावी की एलिवेटेड यावरुन वाद सुरु या विषयीचा प्रस्ताव मार्च 2012 पर्यंत पुढे ढकलला आहे.पुण्यामध्ये दररोज वाहनांच्या संख्येमध्ये भर पडते आहे आणि याला कारणीभूत ठरते ती सक्षम नसलेली सार्वजनिक वाहतुक व्यवस्था. PMT, BRT किंवा मेट्रो यांपैकी काहीही द्या पण त्याची अंमलबजावणी मात्र नीटपणे होऊ देत अशीच सर्वसामान्य पुणेकरांची अपेक्षा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2011 04:51 PM IST

पुण्यात बीआरटी प्रकल्पाचा उडाला बोजवारा

23 नोव्हेंबर

पीएमटी आणि पीएसीएससी पाठोपाठ बीआरटी ही आली आणि आता मेट्रोची स्वप्न पुणेकरांना दाखवली जात आहे. पण यातल्या एकाही गोष्टीची अंमलबजावणी नीटपणे होत नाही. चांगल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची मागणी करणार्‍या पुणेकरांना 'शांतता राजकारण सुरु आहे' हाच प्रयोग पुन्हा-पुन्हा पहायला मिळतोय.

गेल्या निवडणुकीच्या आधी घाईघाईने BRT च्या पायलट प्रोजेक्टचं उद्घाटन झाले. यानंतर एका भागात का होईना चांगली वाहतुक व्यवस्था मिळेलं असं पुणेकरांना वाटलं. पण या प्रोजेक्टचा पाच वर्षांनंतर पूर्णपणे बोजवारा उडाला.

अहमदाबादला जाऊन आल्यानंतर, खासदार सुप्रिया सुळेंना, BRT सुधारण्याची गरज वाटतेय. फक्त BRT नाही तर PMT च्याही पुरेशा बसेस रस्त्यावर धावत नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुरघोडीच्या राजकारणात मेट्रोचही भिजतं घोंगडं झालं आहे. सुप्रिया सुळेंनी बीआरटीसाठी तज्ञांची मतं मागवलीत.पुण्यातली वाहतुक स्थिती

1. पुण्यातील लोकसंख्येनुसार सध्या पुण्यात 3 हजार बसेसची आवश्यकता आहे. सध्या मात्र रस्त्यावर फक्त 1,500 बस चालत आहेत. 2. दरवाजे कुठल्या बाजूला असावेत या वादात बसेसची खरेदी अनेक वर्षांपासून रखडली आहे. 4. राज्य सरकारकडून मेट्रोच्या प्रकल्पाला अजूनही मंजूरी नाही. जून 2010 मध्ये मेट्रोचा आराखडा सर्वसाधारण सभेने मंजूर करुन राज्य सरकारकडे पाठवला. निर्णय अजूनही प्रलंबित...5. आता पुन्हा मेट्रो भुयारी व्हावी की एलिवेटेड यावरुन वाद सुरु या विषयीचा प्रस्ताव मार्च 2012 पर्यंत पुढे ढकलला आहे.

पुण्यामध्ये दररोज वाहनांच्या संख्येमध्ये भर पडते आहे आणि याला कारणीभूत ठरते ती सक्षम नसलेली सार्वजनिक वाहतुक व्यवस्था. PMT, BRT किंवा मेट्रो यांपैकी काहीही द्या पण त्याची अंमलबजावणी मात्र नीटपणे होऊ देत अशीच सर्वसामान्य पुणेकरांची अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2011 04:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close