S M L

पवारांवरील हल्ला हे षडयंत्र - राज ठाकरे

24 नोव्हेंबरशरद पवारांवर झालेला हल्ला ही घटना अत्यंत निंदनीय आहे. याचा मी आणि माझा पक्ष जाहीर निषेध करतो. मागील आठवड्यात माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांच्यावर हल्ला केल्यानंतर पवारांवर हल्ला करणार व्यक्ती एकच आहे त्यामुळे या हल्ल्या मागे षडयंत्र असण्याची प्रतिक्रिया राज यांनी दिली. तसेच काँग्रेस सरकारमधील अनेक नेते भ्रष्टाचारात बुडाले आहे त्यांच्यावर असा हल्ला का होत नाही असा सवालही राज यांनी उपस्थित केला. आज दुपारी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर हरविंदर सिंग या माथेफिरु तरुणांने हल्ला केला. या हल्ल्याचा निषेध करत राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आयबीएन लोकमतशी बोलतांना राज म्हणाले की, शरद पवार हे महाराष्ट्राचे मोठे आणि बुजूर्ग नेते आहे त्यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निंदनिय आहे याचा मी आणि माझा पक्ष जाहीर निषेध करतो. तसेच या हरविंदर सिंग याने काही दिवसांपूर्वी दूरसंचार मंत्री सुखराम यांच्यावर हल्ला केला होता. हा जर माथेफिरू होता तर त्याला सोडण्यात का आले आणि आता त्याच्यावर कोणती कारवाई होणार आहे. भ्रष्टाचाराविरोधात संताप जर करायचा असेल तर काँग्रेसचे जे नेते भ्रष्टाचारात बुडाले आहे त्यांच्यावर असे हल्ले का करत नाही असा संतप्त सवाल राज यांनी उपस्थित केला पवारांवरील हल्ला हा मोठे षडयंत्र असू शकते अशी प्रतिक्रिया ही राज यांनी आयबीएन लोकमतकडे व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2011 11:49 AM IST

पवारांवरील हल्ला हे षडयंत्र - राज ठाकरे

24 नोव्हेंबर

शरद पवारांवर झालेला हल्ला ही घटना अत्यंत निंदनीय आहे. याचा मी आणि माझा पक्ष जाहीर निषेध करतो. मागील आठवड्यात माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांच्यावर हल्ला केल्यानंतर पवारांवर हल्ला करणार व्यक्ती एकच आहे त्यामुळे या हल्ल्या मागे षडयंत्र असण्याची प्रतिक्रिया राज यांनी दिली. तसेच काँग्रेस सरकारमधील अनेक नेते भ्रष्टाचारात बुडाले आहे त्यांच्यावर असा हल्ला का होत नाही असा सवालही राज यांनी उपस्थित केला.

आज दुपारी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर हरविंदर सिंग या माथेफिरु तरुणांने हल्ला केला. या हल्ल्याचा निषेध करत राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आयबीएन लोकमतशी बोलतांना राज म्हणाले की, शरद पवार हे महाराष्ट्राचे मोठे आणि बुजूर्ग नेते आहे त्यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निंदनिय आहे याचा मी आणि माझा पक्ष जाहीर निषेध करतो. तसेच या हरविंदर सिंग याने काही दिवसांपूर्वी दूरसंचार मंत्री सुखराम यांच्यावर हल्ला केला होता. हा जर माथेफिरू होता तर त्याला सोडण्यात का आले आणि आता त्याच्यावर कोणती कारवाई होणार आहे. भ्रष्टाचाराविरोधात संताप जर करायचा असेल तर काँग्रेसचे जे नेते भ्रष्टाचारात बुडाले आहे त्यांच्यावर असे हल्ले का करत नाही असा संतप्त सवाल राज यांनी उपस्थित केला पवारांवरील हल्ला हा मोठे षडयंत्र असू शकते अशी प्रतिक्रिया ही राज यांनी आयबीएन लोकमतकडे व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2011 11:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close