S M L

कापसाला हेक्टरी मदत करणार - मुख्यमंत्री

23 नोव्हेंबरकापसाला सरकारकडून आज हमीभाव जाहीर होईल या आशेवर असलेल्या कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या तोंडाला अक्षरशः पानं पुसली आहेत. कापूस उत्पादक शेतकर्‍यांना क्विंटलमागे मदत करण्याऐवजी त्यांना आता दर हेक्टरी मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण हा निर्णय आचारसंहितेमुळे जाहीर करता येत नाही, असं कारण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात या निर्णयाची घोषणा सरकार करेल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्यापूर्वी सकाळी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय प्रमुखांची बैठक घेतली. पण त्या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर तोडगा काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना दिलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेतला. पण आचारसंहितेचं कारण सांगत निर्णय जाहीर केला नाही. राज्यात नगरपालिकेच्या निवडणुकांची आचारसंहिता असल्यामुळे सरकारला कोणतीही घोषणा करता येणार नाही असं पत्र निवडणूक आयोगाकडून आल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2011 01:41 PM IST

कापसाला हेक्टरी मदत करणार - मुख्यमंत्री

23 नोव्हेंबर

कापसाला सरकारकडून आज हमीभाव जाहीर होईल या आशेवर असलेल्या कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या तोंडाला अक्षरशः पानं पुसली आहेत. कापूस उत्पादक शेतकर्‍यांना क्विंटलमागे मदत करण्याऐवजी त्यांना आता दर हेक्टरी मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण हा निर्णय आचारसंहितेमुळे जाहीर करता येत नाही, असं कारण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात या निर्णयाची घोषणा सरकार करेल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्यापूर्वी सकाळी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय प्रमुखांची बैठक घेतली. पण त्या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर तोडगा काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना दिलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेतला. पण आचारसंहितेचं कारण सांगत निर्णय जाहीर केला नाही. राज्यात नगरपालिकेच्या निवडणुकांची आचारसंहिता असल्यामुळे सरकारला कोणतीही घोषणा करता येणार नाही असं पत्र निवडणूक आयोगाकडून आल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2011 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close