S M L

उत्सुकता महाशतकाची ; सचिन 67 रन्सवर नॉटआऊट

24 नोव्हेंबरमुंबई टेस्टमध्ये वेस्ट इंडीजची पहिली इनिंग 590 रन्समध्ये आटोपल्यावर भारताने तिसर्‍या दिवस अखेर 3 विकेटवर 281 रन केले आहेत. सगळयात महत्तवाचं म्हणजे सचिन तेंडुलकर 67 रनवर खेळतोय. भारतीय इनिंगमध्येही प्रत्येक बॅट्समनला सुरुवात मिळाली. सेहवाग आणि गंभीर यांनी 67 रनची ओपनिंग टीमला करुन दिली. त्यानंतर सेहवाग 37 रनवर आऊट झाला. पण गंभीरने आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केली. द्रविड तर आज भन्नाट फॉर्ममध्ये होता. आणि तो आल्यावर रनचा वेगही वाढला होता. हाफ सेंच्युरी त्याने दणक्यात पूर्ण केली. आणि त्याचबरोबर टेस्ट क्रिकेटमध्ये 13 हजार रनचा टप्पाही त्याने गाठला. पण तो सेंच्युरी करणार असं वाटत असतानाच 81 रनवर आऊट झाला. सॅम्युअल्सने त्याला क्लीनबोल्ड केलं. पण त्यानंतर सचिन आणि लक्ष्मण यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. तिसर्‍या दिवस अखेर सचिन 67 तर लक्ष्मण 32 रनवर खेळत आहे. भारतीय टीम आता 309 रननी पिछाडीवर आहे. चौथ्या दिवशी सगळ्यांना उत्सुकता असेल घरच्या मैदानावर सचिन सेंच्युरी करतो का याची. वानखेडे स्टेडिअम आजपासूनच हाऊसफुल्ल आहे. आणि उद्याही मोठ्या गर्दीची अपेक्षा आहे. दरम्यान, सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डब्रेक सेंच्युरीची उत्सुकता क्रिकेट प्रेमींमध्ये आहे. पण त्याआधी द वॉल राहुल द्रविडच्या नावावर आज एक रेकॉर्ड जमा झाला. द्रविडने टेस्ट क्रिकेटमध्ये 13 हजार रन्सचा टप्पा ओलांडला. सर्वाधिक रन करणार्‍या बॅट्समनच्या यादीत आता तो सचिन तेंडुलकरच्या खालोखाल दुसर्‍या क्रमांकावर आहे. आणि 13 हजारचा टप्पा ओलांडणारा तर तो केवळ दुसरा बॅट्समन आहे. 160 टेस्टमध्ये त्याने ही कामगिरी केलीय. आणि यात 36 सेंच्युरी आणि 61 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. त्याचं ऍव्हरेज आहे 53.29 रनचं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2011 05:28 PM IST

उत्सुकता महाशतकाची ; सचिन 67 रन्सवर नॉटआऊट

24 नोव्हेंबर

मुंबई टेस्टमध्ये वेस्ट इंडीजची पहिली इनिंग 590 रन्समध्ये आटोपल्यावर भारताने तिसर्‍या दिवस अखेर 3 विकेटवर 281 रन केले आहेत. सगळयात महत्तवाचं म्हणजे सचिन तेंडुलकर 67 रनवर खेळतोय. भारतीय इनिंगमध्येही प्रत्येक बॅट्समनला सुरुवात मिळाली. सेहवाग आणि गंभीर यांनी 67 रनची ओपनिंग टीमला करुन दिली. त्यानंतर सेहवाग 37 रनवर आऊट झाला. पण गंभीरने आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केली. द्रविड तर आज भन्नाट फॉर्ममध्ये होता. आणि तो आल्यावर रनचा वेगही वाढला होता.

हाफ सेंच्युरी त्याने दणक्यात पूर्ण केली. आणि त्याचबरोबर टेस्ट क्रिकेटमध्ये 13 हजार रनचा टप्पाही त्याने गाठला. पण तो सेंच्युरी करणार असं वाटत असतानाच 81 रनवर आऊट झाला. सॅम्युअल्सने त्याला क्लीनबोल्ड केलं. पण त्यानंतर सचिन आणि लक्ष्मण यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. तिसर्‍या दिवस अखेर सचिन 67 तर लक्ष्मण 32 रनवर खेळत आहे. भारतीय टीम आता 309 रननी पिछाडीवर आहे. चौथ्या दिवशी सगळ्यांना उत्सुकता असेल घरच्या मैदानावर सचिन सेंच्युरी करतो का याची. वानखेडे स्टेडिअम आजपासूनच हाऊसफुल्ल आहे. आणि उद्याही मोठ्या गर्दीची अपेक्षा आहे.

दरम्यान, सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डब्रेक सेंच्युरीची उत्सुकता क्रिकेट प्रेमींमध्ये आहे. पण त्याआधी द वॉल राहुल द्रविडच्या नावावर आज एक रेकॉर्ड जमा झाला. द्रविडने टेस्ट क्रिकेटमध्ये 13 हजार रन्सचा टप्पा ओलांडला. सर्वाधिक रन करणार्‍या बॅट्समनच्या यादीत आता तो सचिन तेंडुलकरच्या खालोखाल दुसर्‍या क्रमांकावर आहे. आणि 13 हजारचा टप्पा ओलांडणारा तर तो केवळ दुसरा बॅट्समन आहे. 160 टेस्टमध्ये त्याने ही कामगिरी केलीय. आणि यात 36 सेंच्युरी आणि 61 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. त्याचं ऍव्हरेज आहे 53.29 रनचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2011 05:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close