S M L

जे.डे हत्येप्रकरणी महिला पत्रकार जिग्ना वोराला अटक

25 नोव्हेंबरज्येष्ठ पत्रकार जे.डे यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक अटक झाली आहे. पत्रकार जिग्ना वोरा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. मिड डे चे वरिष्ठ पत्रकार जे.डे. यंाची 11 जुनला हत्या झाली होती. जे.डेंची हत्या छोटा राजन गँगने केली होती. आज या प्रकरणात एशियन एज या इंग्रजीची पेपरची महिला पत्रकार जिग्ना व्होरा हिला आज सकाळी अटक करण्यात आली. जिग्ना वोरा छोटा राजनच्या संपर्कात होती, आणि तिने गँगला मदत केल्याचा तिच्यावर आरोप आहे. याआधी या प्रकरणात मुख्य हल्लेखोर सतीश काल्यासह 10 जणांना अटक करण्यात आली होती. आणि आजची ही अटक याप्रकरणातली 11वी अटक आहे. कोण आहे जिग्ना ?- 7 वर्षांपासून पत्रकारितेत - फ्रीप्रेसमधून पत्रकारितेला सुरुवात - एशियन एज या वृत्तपत्रात 5 वर्षांपासून कार्यरतजिग्नावरचे आरोप- गँगस्टर छोटा राजनला माहिती पुरवल्याचा आरोप आहे.- जे.डे. याच्या घराची , आँफिसचे पत्ते पुरवल्याचा आरोप आहे.- जे.डे. याच्या गाडीची माहिती पुरवल्याचा आरोप आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2011 05:31 PM IST

जे.डे हत्येप्रकरणी महिला पत्रकार जिग्ना वोराला अटक

25 नोव्हेंबर

ज्येष्ठ पत्रकार जे.डे यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक अटक झाली आहे. पत्रकार जिग्ना वोरा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. मिड डे चे वरिष्ठ पत्रकार जे.डे. यंाची 11 जुनला हत्या झाली होती. जे.डेंची हत्या छोटा राजन गँगने केली होती. आज या प्रकरणात एशियन एज या इंग्रजीची पेपरची महिला पत्रकार जिग्ना व्होरा हिला आज सकाळी अटक करण्यात आली. जिग्ना वोरा छोटा राजनच्या संपर्कात होती, आणि तिने गँगला मदत केल्याचा तिच्यावर आरोप आहे. याआधी या प्रकरणात मुख्य हल्लेखोर सतीश काल्यासह 10 जणांना अटक करण्यात आली होती. आणि आजची ही अटक याप्रकरणातली 11वी अटक आहे.

कोण आहे जिग्ना ?

- 7 वर्षांपासून पत्रकारितेत - फ्रीप्रेसमधून पत्रकारितेला सुरुवात - एशियन एज या वृत्तपत्रात 5 वर्षांपासून कार्यरत

जिग्नावरचे आरोप

- गँगस्टर छोटा राजनला माहिती पुरवल्याचा आरोप आहे.- जे.डे. याच्या घराची , आँफिसचे पत्ते पुरवल्याचा आरोप आहे.- जे.डे. याच्या गाडीची माहिती पुरवल्याचा आरोप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2011 05:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close