S M L

ओ नो...सचिनचे महाशतक हुकले

25 नोव्हेंबरसचिन तेंडुलकरच्या महाशतकाकडे वाट लावून असलेल्या सचिनच्या चाहत्यांची आजही निराशा झाली. मुंबई टेस्टमध्ये सचिन तेंडुलकरची सेंच्युरी होईल म्हणून वानखेडे स्टेडिअमवर लोकांनी खचाखच गर्दी केली होती. पण त्यांच्या पदरी आज पुन्हा निराशा आली. 94 रनवर सचिन आऊट झाला तेव्हा स्वत: सचिनही निराश दिसत होता. रामपॉलच्या बॉलिंगवर त्याने सॅमीकडे दुसर्‍या स्लिपमध्ये कॅच दिला तेव्हा स्टेडिअमवर कमालीची शांतता पसरली. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा सचिन 67 रनवर नॉटआऊट होता. लक्ष्मण पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. पण सचिन सुरुवातीला चांगलाच फॉर्ममध्ये होता. आल्या आल्या त्याने बिशूला सिक्स मारला. शिवाय फास्ट बॉलर्सचे बॉलही तो ड्राईव्ह करत होता. अर्ध्यातासातच 28 रन त्याने केले. पण सेंच्युरीच्या जवळ आल्यावर अचानक एक लूझ शॉट तो खेळला. आणि हा बॉल त्याची विकेट घेऊन गेला. पण आर अश्विननं या क्रिकेटप्रेमींना निराश होऊ दिलं नाही. त्याने शानदार सेंच्युरी ठोकली. 2 सिक्स आणि तब्बल 15 फोरची बरसात त्याने केली. आपली तिसरीच टेस्ट मॅच खेळणार्‍या अश्विननं सेंच्युरी तर केलीच पण भारतीय टीमची इनिंगही सावरली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2011 10:31 AM IST

ओ नो...सचिनचे महाशतक हुकले

25 नोव्हेंबर

सचिन तेंडुलकरच्या महाशतकाकडे वाट लावून असलेल्या सचिनच्या चाहत्यांची आजही निराशा झाली. मुंबई टेस्टमध्ये सचिन तेंडुलकरची सेंच्युरी होईल म्हणून वानखेडे स्टेडिअमवर लोकांनी खचाखच गर्दी केली होती. पण त्यांच्या पदरी आज पुन्हा निराशा आली. 94 रनवर सचिन आऊट झाला तेव्हा स्वत: सचिनही निराश दिसत होता.

रामपॉलच्या बॉलिंगवर त्याने सॅमीकडे दुसर्‍या स्लिपमध्ये कॅच दिला तेव्हा स्टेडिअमवर कमालीची शांतता पसरली. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा सचिन 67 रनवर नॉटआऊट होता. लक्ष्मण पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. पण सचिन सुरुवातीला चांगलाच फॉर्ममध्ये होता. आल्या आल्या त्याने बिशूला सिक्स मारला. शिवाय फास्ट बॉलर्सचे बॉलही तो ड्राईव्ह करत होता.

अर्ध्यातासातच 28 रन त्याने केले. पण सेंच्युरीच्या जवळ आल्यावर अचानक एक लूझ शॉट तो खेळला. आणि हा बॉल त्याची विकेट घेऊन गेला. पण आर अश्विननं या क्रिकेटप्रेमींना निराश होऊ दिलं नाही. त्याने शानदार सेंच्युरी ठोकली. 2 सिक्स आणि तब्बल 15 फोरची बरसात त्याने केली. आपली तिसरीच टेस्ट मॅच खेळणार्‍या अश्विननं सेंच्युरी तर केलीच पण भारतीय टीमची इनिंगही सावरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2011 10:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close