S M L

लोकसभेतही गाजला पवारांवरच्या हल्ल्याचा मुद्दा

25 नोव्हेंबरसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवसही वादळी ठरतो. राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृह सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे. FDI च्या मुद्यावरून राज्यसभेत गदारोळ झाला. काल कॅबिनेटच्या बैठकीत रिटेल क्षेत्रात 51 टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली. याला विरोधकांच्या सोबतच तृणमूलचाही विरोध आहे. पण याविषयी कोणतीही चर्चा न घेण्यात आल्याचा निषेध आज राज्यसभेत करण्यात आला. दर शरद पवारांवर काल झालेल्या हल्ल्याचा मुद्दा लोकसभेत गाजला. खासदारांना अपमानित व्हावं लागतंय मात्र सरकार झोपले आहे अशी टीका शरद यादव यांनी केलीय. सोबतच त्यांनी मीडियावरही टीका केली. पवारांवरच्या हल्ल्याचा लोकसभेत निषेध करण्यात आला. दरम्यान लोकसभेतही एफडीआयच्या मुद्यावरून गदारोळ झाला आणि लोकसभेचंही कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. सलग चौथ्या दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज न झाल्याने करदात्यांचे 12 कोटी रुपये आतापर्यंत पाण्यात गेले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2011 11:03 AM IST

लोकसभेतही गाजला पवारांवरच्या हल्ल्याचा मुद्दा

25 नोव्हेंबर

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवसही वादळी ठरतो. राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृह सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे. FDI च्या मुद्यावरून राज्यसभेत गदारोळ झाला. काल कॅबिनेटच्या बैठकीत रिटेल क्षेत्रात 51 टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली. याला विरोधकांच्या सोबतच तृणमूलचाही विरोध आहे. पण याविषयी कोणतीही चर्चा न घेण्यात आल्याचा निषेध आज राज्यसभेत करण्यात आला. दर शरद पवारांवर काल झालेल्या हल्ल्याचा मुद्दा लोकसभेत गाजला.

खासदारांना अपमानित व्हावं लागतंय मात्र सरकार झोपले आहे अशी टीका शरद यादव यांनी केलीय. सोबतच त्यांनी मीडियावरही टीका केली. पवारांवरच्या हल्ल्याचा लोकसभेत निषेध करण्यात आला. दरम्यान लोकसभेतही एफडीआयच्या मुद्यावरून गदारोळ झाला आणि लोकसभेचंही कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. सलग चौथ्या दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज न झाल्याने करदात्यांचे 12 कोटी रुपये आतापर्यंत पाण्यात गेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2011 11:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close