S M L

भारताने मालिका जिंकली ; व्हाइटवॉशची संधी हुकली

26 नोव्हेंबरभारत आणि वेस्ट इंडीज दरम्यानची मुंबई टेस्ट अखेरच्या बॉलपर्यंत रंगली. पण टेस्ट अखेर ड्रॉ झालीय. दोन्ही टीमचे स्कोअर समसमान राहिले. भारतीय टीमला विजयासाठी एकूण 243 रन्सची गरज होती. पण निर्धारित ओव्हर्समध्ये टीम नऊ विकेटवर 242 रन्सची मजल मारु शकली. शेवटच्या बॉलवर अश्विन स्ट्राईकवर होता. आणि दोन रन विजयासाठी हवे होते. पण दुसरा रन घेताना अश्विन रनआऊट झाला. त्यापूर्वी भारताच्या सुरुवातीच्या बॅट्समननी चांगली सुरुवात केली होती. सेहवाग आणि विराट कोहलीने हाफ सेंच्युरी केली. तर द्रविड, लक्ष्मणनेही 33 आणि 31 रन केले. पण ठरावीक अंतराने विकेट जात राहिल्या. आणि त्यामुळे टीमवरचं दडपण वाढलं. ही टेस्ट ड्रॉ झाली असली तरी सीरिज भारतीय टीमने 2-0 अशी जिंकलीय. विंडीजला व्हाइटवॉश देण्याची संधी मात्र हुकली. मुंबई टेस्टच्या आजच्या दिवसाचे हिरो ठरले ते स्पीन बॉलर्स प्रग्यान ओझा आणि आर अश्विन. मॅचच्या चौथ्या दिवसअखेर 81 रन्सवर 2 विकेट अशा मजबूत स्थितीत असलेल्या विंडीजचे 8 बॅट्समन केवल 53 रन्सवर आऊट झाले. ब्राथवेटला आऊट करत ओझाने पाचव्या दिवसाची सुरुवात चांगली करुन दिली. यानंतर कर्क एडवर्ड, ब्राव्हो, सॅम्युअल या प्रमुख बॅट्समननाही त्याने पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. प्रग्यान ओझाने दुसर्‍या इनिंगमध्ये अवघ्या 47 रन्समध्ये तब्बल 6 विकेट घेतल्या. पहिल्या इनिंगमध्ये त्यानं 1 विकेट घेतली होती.आर अश्विनही यात मागे नव्हता. पहिल्या इनिंगमध्ये 6 विकेट घेणार्‍या अश्विननं दुसर्‍या इनिंगमध्येही 4 विकेट घेतल्या. बिशुला आऊट करत त्याने विंडिजच्या इनिंगला फुलस्टॉप लावला. अश्विनने केवळ 34 रन्स देत 4 विकेट घेतल्या. या संपूर्ण सीरिज अश्विनसाठी जबरदस्त यशस्वी ठरली. तीन मॅचच्या या सीरिजमध्ये अश्विनने तब्बल 22 विकेट घेतल्यात. 47 रन्समध्ये 6 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. याशिवाय बॅटिंगमध्येही त्याने कमाल केली. तिसर्‍या टेस्टमध्ये त्यानं सेंच्युरी करत भारताला भक्कम स्कोरही उभा करुन दिला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2011 11:35 AM IST

भारताने मालिका जिंकली ; व्हाइटवॉशची संधी हुकली

26 नोव्हेंबर

भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यानची मुंबई टेस्ट अखेरच्या बॉलपर्यंत रंगली. पण टेस्ट अखेर ड्रॉ झालीय. दोन्ही टीमचे स्कोअर समसमान राहिले. भारतीय टीमला विजयासाठी एकूण 243 रन्सची गरज होती. पण निर्धारित ओव्हर्समध्ये टीम नऊ विकेटवर 242 रन्सची मजल मारु शकली. शेवटच्या बॉलवर अश्विन स्ट्राईकवर होता. आणि दोन रन विजयासाठी हवे होते. पण दुसरा रन घेताना अश्विन रनआऊट झाला. त्यापूर्वी भारताच्या सुरुवातीच्या बॅट्समननी चांगली सुरुवात केली होती. सेहवाग आणि विराट कोहलीने हाफ सेंच्युरी केली. तर द्रविड, लक्ष्मणनेही 33 आणि 31 रन केले. पण ठरावीक अंतराने विकेट जात राहिल्या. आणि त्यामुळे टीमवरचं दडपण वाढलं. ही टेस्ट ड्रॉ झाली असली तरी सीरिज भारतीय टीमने 2-0 अशी जिंकलीय. विंडीजला व्हाइटवॉश देण्याची संधी मात्र हुकली.

मुंबई टेस्टच्या आजच्या दिवसाचे हिरो ठरले ते स्पीन बॉलर्स प्रग्यान ओझा आणि आर अश्विन. मॅचच्या चौथ्या दिवसअखेर 81 रन्सवर 2 विकेट अशा मजबूत स्थितीत असलेल्या विंडीजचे 8 बॅट्समन केवल 53 रन्सवर आऊट झाले. ब्राथवेटला आऊट करत ओझाने पाचव्या दिवसाची सुरुवात चांगली करुन दिली. यानंतर कर्क एडवर्ड, ब्राव्हो, सॅम्युअल या प्रमुख बॅट्समननाही त्याने पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. प्रग्यान ओझाने दुसर्‍या इनिंगमध्ये अवघ्या 47 रन्समध्ये तब्बल 6 विकेट घेतल्या. पहिल्या इनिंगमध्ये त्यानं 1 विकेट घेतली होती.

आर अश्विनही यात मागे नव्हता. पहिल्या इनिंगमध्ये 6 विकेट घेणार्‍या अश्विननं दुसर्‍या इनिंगमध्येही 4 विकेट घेतल्या. बिशुला आऊट करत त्याने विंडिजच्या इनिंगला फुलस्टॉप लावला. अश्विनने केवळ 34 रन्स देत 4 विकेट घेतल्या. या संपूर्ण सीरिज अश्विनसाठी जबरदस्त यशस्वी ठरली. तीन मॅचच्या या सीरिजमध्ये अश्विनने तब्बल 22 विकेट घेतल्यात. 47 रन्समध्ये 6 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. याशिवाय बॅटिंगमध्येही त्याने कमाल केली. तिसर्‍या टेस्टमध्ये त्यानं सेंच्युरी करत भारताला भक्कम स्कोरही उभा करुन दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2011 11:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close