S M L

मुंबईच्या सागरी सुरक्षकांना कारवाईचे अधिकारच नाही !

सुधाकर काश्यप, मुंबई 26 नोव्हेंबरमुंबईला असलेल्या समुद्र किनार्‍यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना सागरी बंदोबस्त ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने सागरी पोलीस स्टेशनची निर्मिती केली आहे. पण, काही प्रमाणात हे सागरी पोलीस स्टेशन हे फक्त कागदावरच असल्याचं दिसून येतं आहे. मुंबईचा हा अथांग सागरी किनारा. या मार्गाने पुन्हा दहशतवादी मुंबईत प्रवेश करु नये याची सर्व जबाबदारी या सागरी पोलीस स्टेशनवर आहे. किनार्‍याचा अंदाज घेऊनच त्यांची निर्मिती करण्यात आली होती. सागरी पोलीस यंत्रणा -- पोलीस अधिकारी आणि कर्मचारी 750 .- माहिम चौपाटी येथे पोलीस स्टेशनची इमारत- गिरगाव चौपाटी , माहिम चौपटी , वर्सोवा चौपाटी आणि गोराई चौपाटी येथे चौक्या - गिरगाव चौपाटी , माहिम चौपटी , वर्सोवा चौपाटी आणि गोराई चौपाटी येथे जेट्टी - चार सी लेग बोटी- चार स्पीड बोटी- प्रशिक्षित स्टाफ वरिष्ठ अधिकारी हे सर्व केल्याचं सांगतात. पण सत्य परिस्थीती वेगळी आहे.- सध्या केवळ 150 अधिकारी आणि पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत- प्रशिक्षित स्टाफ नाही - इथल्या अधिकारी कर्मचार्‍यांचा वापर जास्त काळ इतर ठिकाणच्या बंदोबस्त कामी केला जातो- सागरी पोलीस स्टेशनची इमारत सहा वर्षा नंतरही उभारली गेली नाही - निधी उपलब्ध असतानाही गिरगाव , माहिम , जुहू , वर्सोवा आणि गोराई येथील चौपाड्यावर चौक्या उभारल्या नाही- गिरगाव , माहिम , वर्सोवा आणि गोराई चौपाटी येथे जेट्टी उभारल्या नाहीत- जेट्टी उभारण्या बाबत पुरेसा निधी उपलब्ध नाही- सर्व कारभार लालफितीत अडकल्याचं म्हटलं जातंयमुंबईत सागरी पोलीस स्टेशन स्थापन तर केलं. पण त्याला एक्झीक्युटिव्ह पॉवर अर्थात कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. राज्यातील इतर सागरी पोलीस स्टेशनला कारवाईचे अधिकार आहेत. कारवाई करण्याचे अधिकार नसल्याने मुंबईतील सागरी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी सध्या केवळ बंदोबस्ताचे काम करत आहेत.सागरी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी बाराबारा तास समुद्रात असतात. गस्त घालताना किंवा एखादा धोका पत्करताना समुद्रात बोट बिघडली, तर त्यांना लगेचंच मदत मिळेलंच असंही नाही. सागरी पोलीस स्टेशनचा कर्मचारी रोजच आपला जीव धोक्यात घालून काम करत असतो. पण एटीएस प्रमाणे त्यांना सवलती देण्यास मात्र सरकार विसरलं आहे. सागरी पोलीस यंत्रणा म्हणजे अक्षरश: चलती का नाम गाडी असल्याचा धक्कादायक प्रकारच यातून उघड होतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2011 03:42 PM IST

मुंबईच्या सागरी सुरक्षकांना कारवाईचे अधिकारच नाही !

सुधाकर काश्यप, मुंबई

26 नोव्हेंबर

मुंबईला असलेल्या समुद्र किनार्‍यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना सागरी बंदोबस्त ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने सागरी पोलीस स्टेशनची निर्मिती केली आहे. पण, काही प्रमाणात हे सागरी पोलीस स्टेशन हे फक्त कागदावरच असल्याचं दिसून येतं आहे. मुंबईचा हा अथांग सागरी किनारा. या मार्गाने पुन्हा दहशतवादी मुंबईत प्रवेश करु नये याची सर्व जबाबदारी या सागरी पोलीस स्टेशनवर आहे. किनार्‍याचा अंदाज घेऊनच त्यांची निर्मिती करण्यात आली होती.

सागरी पोलीस यंत्रणा -

- पोलीस अधिकारी आणि कर्मचारी 750 .- माहिम चौपाटी येथे पोलीस स्टेशनची इमारत- गिरगाव चौपाटी , माहिम चौपटी , वर्सोवा चौपाटी आणि गोराई चौपाटी येथे चौक्या - गिरगाव चौपाटी , माहिम चौपटी , वर्सोवा चौपाटी आणि गोराई चौपाटी येथे जेट्टी - चार सी लेग बोटी- चार स्पीड बोटी- प्रशिक्षित स्टाफ वरिष्ठ अधिकारी हे सर्व केल्याचं सांगतात. पण सत्य परिस्थीती वेगळी आहे.

- सध्या केवळ 150 अधिकारी आणि पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत- प्रशिक्षित स्टाफ नाही - इथल्या अधिकारी कर्मचार्‍यांचा वापर जास्त काळ इतर ठिकाणच्या बंदोबस्त कामी केला जातो- सागरी पोलीस स्टेशनची इमारत सहा वर्षा नंतरही उभारली गेली नाही - निधी उपलब्ध असतानाही गिरगाव , माहिम , जुहू , वर्सोवा आणि गोराई येथील चौपाड्यावर चौक्या उभारल्या नाही- गिरगाव , माहिम , वर्सोवा आणि गोराई चौपाटी येथे जेट्टी उभारल्या नाहीत- जेट्टी उभारण्या बाबत पुरेसा निधी उपलब्ध नाही- सर्व कारभार लालफितीत अडकल्याचं म्हटलं जातंय

मुंबईत सागरी पोलीस स्टेशन स्थापन तर केलं. पण त्याला एक्झीक्युटिव्ह पॉवर अर्थात कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. राज्यातील इतर सागरी पोलीस स्टेशनला कारवाईचे अधिकार आहेत. कारवाई करण्याचे अधिकार नसल्याने मुंबईतील सागरी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी सध्या केवळ बंदोबस्ताचे काम करत आहेत.

सागरी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी बाराबारा तास समुद्रात असतात. गस्त घालताना किंवा एखादा धोका पत्करताना समुद्रात बोट बिघडली, तर त्यांना लगेचंच मदत मिळेलंच असंही नाही. सागरी पोलीस स्टेशनचा कर्मचारी रोजच आपला जीव धोक्यात घालून काम करत असतो. पण एटीएस प्रमाणे त्यांना सवलती देण्यास मात्र सरकार विसरलं आहे. सागरी पोलीस यंत्रणा म्हणजे अक्षरश: चलती का नाम गाडी असल्याचा धक्कादायक प्रकारच यातून उघड होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2011 03:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close