S M L

'...कम से कम इलाज का खर्चा तो दिजीए' !

अजित मांढरे, मंुबई 26 नोव्हेंबरमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 163 जणांचा मृत्यू झाला. तर 241 जण जखमी झाले. या हल्ल्याला आता तीन वर्षे झाली आहेत. पण, आजही त्यातील पीडितांना संपूर्ण आर्थिक मदत मिळालेली नाही. परिणामी अगदी हालाखीचं जीवन त्यांना जगावे लागतं आहे. पीडित सबीरा खान म्हणतात,में हात जोड के बिनंती करती हूँ की, बस कम से कम मेरे इलाज का खर्चा तो दिजीए .वाडी बंदर इथं 26 नोव्हेंबर 2008 ला टॅक्सीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सबीरा खान गंभीर जखमी झाल्या होत्या. या बॉम्बस्फोटामुळे त्यांना कायमच अपंगत्व आलंय. त्या घटनेनंतर त्यांचं आयुष्यच उद्‌ध्वस्त झालं आहे.सबीरा खान यांना शिकण्याची आणि शिकवण्याची आवड आहे. त्या शिक्षिका आहेत. या कपाटात याआधी पुस्तकं भरलेली असायची पण, 26/11 च्या घटनेनंतर या ठिकाणी पुस्तकांची जागा घेतली ती हॉस्पिटलच्या बिलांनी आणि आर्थिक मदत मिळण्यासाठी सबीरा खान यांनी नेत्यांना आणि मंत्र्यांना पाठवलेल्या विनंती पत्रांनी. आज 26/11 या घटनेला 3 वर्षे पुर्ण झालेत पण, सबीरा खान यांना पाहिजे तशी मदत मिळाली नाही.सबीरा यांचं जर लवकर ऑपरेशन झालं नाही तर त्यांना पॅरॅलसिस होऊ शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यासाठी पैशांची गरज आहे. त्यांनी सगळीकडे पैशांची मागणी केली पण, हाती निराशाचं लागली. काही ठिकाणी तर त्यांना अक्षरशः हाकलून लावण्यात आलं.सबीरा खानचा मुलगा हमीद खान म्हणतो,2008 की घटना को 3 साल हो गए हे, अब आपको कुछ नही मिलेगा ऐसा कह के कई जगह से हमे भगा दिया गया. विरोधी पक्षांनी या पीडितांचं दु:ख राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण, त्यांनाही यात यश आलं नाही. भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणतात, या सगळ्या पीडितांना संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करतोय पण, त्यांना या पीडितांना भेटण्यासाठी वेळ नाहीए. लाज वाटते मला राज्य सरकारची .सबीरा खान यांना मुख्यमंत्री फंडातून फक्त दीड लाख मिळालेत. मंुबईवर झालेल्या दहशतवादी हल्यातील शंभर पेक्षा जास्त असे पीडित आहे ज्यांना केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकरची मदत मिळाली नाही. पण, जनतेकडून त्यांना मदत मिळेल अशी या पीडितांना अपेक्षा आहे. पीडित सबीरा खान म्हणतात, मैं किसी की माँ हूँ किसी की बहन हूँ, मै सबसे बिनंती करती हूँ की, आगे आईये और हमे मदत करे.सबीरा खान यांच्याशी संपर्क साधू शकतात या क्रमांकावर : 9221903194

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2011 01:55 PM IST

'...कम से कम इलाज का खर्चा तो दिजीए' !

अजित मांढरे, मंुबई

26 नोव्हेंबर

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 163 जणांचा मृत्यू झाला. तर 241 जण जखमी झाले. या हल्ल्याला आता तीन वर्षे झाली आहेत. पण, आजही त्यातील पीडितांना संपूर्ण आर्थिक मदत मिळालेली नाही. परिणामी अगदी हालाखीचं जीवन त्यांना जगावे लागतं आहे. पीडित सबीरा खान म्हणतात,में हात जोड के बिनंती करती हूँ की, बस कम से कम मेरे इलाज का खर्चा तो दिजीए .वाडी बंदर इथं 26 नोव्हेंबर 2008 ला टॅक्सीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सबीरा खान गंभीर जखमी झाल्या होत्या. या बॉम्बस्फोटामुळे त्यांना कायमच अपंगत्व आलंय. त्या घटनेनंतर त्यांचं आयुष्यच उद्‌ध्वस्त झालं आहे.सबीरा खान यांना शिकण्याची आणि शिकवण्याची आवड आहे. त्या शिक्षिका आहेत. या कपाटात याआधी पुस्तकं भरलेली असायची पण, 26/11 च्या घटनेनंतर या ठिकाणी पुस्तकांची जागा घेतली ती हॉस्पिटलच्या बिलांनी आणि आर्थिक मदत मिळण्यासाठी सबीरा खान यांनी नेत्यांना आणि मंत्र्यांना पाठवलेल्या विनंती पत्रांनी. आज 26/11 या घटनेला 3 वर्षे पुर्ण झालेत पण, सबीरा खान यांना पाहिजे तशी मदत मिळाली नाही.सबीरा यांचं जर लवकर ऑपरेशन झालं नाही तर त्यांना पॅरॅलसिस होऊ शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यासाठी पैशांची गरज आहे. त्यांनी सगळीकडे पैशांची मागणी केली पण, हाती निराशाचं लागली. काही ठिकाणी तर त्यांना अक्षरशः हाकलून लावण्यात आलं.सबीरा खानचा मुलगा हमीद खान म्हणतो,2008 की घटना को 3 साल हो गए हे, अब आपको कुछ नही मिलेगा ऐसा कह के कई जगह से हमे भगा दिया गया. विरोधी पक्षांनी या पीडितांचं दु:ख राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण, त्यांनाही यात यश आलं नाही. भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणतात, या सगळ्या पीडितांना संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करतोय पण, त्यांना या पीडितांना भेटण्यासाठी वेळ नाहीए. लाज वाटते मला राज्य सरकारची .सबीरा खान यांना मुख्यमंत्री फंडातून फक्त दीड लाख मिळालेत. मंुबईवर झालेल्या दहशतवादी हल्यातील शंभर पेक्षा जास्त असे पीडित आहे ज्यांना केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकरची मदत मिळाली नाही. पण, जनतेकडून त्यांना मदत मिळेल अशी या पीडितांना अपेक्षा आहे. पीडित सबीरा खान म्हणतात, मैं किसी की माँ हूँ किसी की बहन हूँ, मै सबसे बिनंती करती हूँ की, आगे आईये और हमे मदत करे.

सबीरा खान यांच्याशी संपर्क साधू शकतात या क्रमांकावर : 9221903194

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2011 01:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close